ओखी वादळामुळे नाशिक त्र्यंबकसह जिल्ह्यात पाऊस, द्राक्षाचे नुकसान

0

नाशिक, ता 5, – ओखी वादळाचा पट्टा मुंबई कडून सुरतकडे सरकल्याने नाशिकसह परिसरात पावसाला सुरुवात झाली.

सकाळी नाशिक शहर, त्र्यंबकेश्वर, बागलाण तालुक्यात पाऊस पडत आहे. त्र्यंबकेश्वर येथे काल रात्री गार वारा वाहून रिमझिम पाऊस पडला. या पावसामुळे शेतात काढणी केलेल्या भात पिकाचे नुकसान झाले आहे.

दरम्यान ओखी वादळाचा तडाखा परिसराला बसू शकतो, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

या यावेळी आलेल्या पावसाने द्राक्ष शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस या पावसाचे जिल्ह्यावर सावट राहणार आहे.

बागलाणमध्ये पाऊस, शेतकरी हवालदिल

डांगसौंदाणे (बागलाण) परिसरात आज पहाटे  पासून पावसाला सुरवात काल दिवसभर ढगाळ वातवरणानंतर आज पहाटे 5 वाजेपासून रिमझिम पावसाला सुरवात झाल्याने द्राक्ष उत्पादक व् नव्याने उन्हाळ् कांदा लागवड केलेला शेतकरी हवालदिल झाला आहे.

या वातावरणाने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान असून काढणी आलेल्या मालाचे मोठे नुकसान होउन् शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

हवेतील अधिकाधिक ठंड गारव्या मुळे तयार द्राक्ष बागेचा माल ब्रेक होऊन मोठे नुकसान द्राक्ष उत्पादकांचे होणार असून नव्याने लागवड झालेला उन्हाळ् कांदा ही बुरशीजन्य रोगाना बळी पडणार आहे, तर खरीपाचा कापणी करुण पडलेला मका व् चारा ही या बेमोसमी पावसामुळे खराब होणार आहे.

LEAVE A REPLY

*