Friday, April 26, 2024
Homeनगरकोपरगावात गोदावरी दुथडी!

कोपरगावात गोदावरी दुथडी!

सार्वमत

भावलीला 120 मिमी, गंगापूर पाणलोटातही दमदार पाऊस

- Advertisement -

अस्तगाव (वार्ताहर) – दारणा तसेच गंगापूर धरणांच्या पाणलोटात शुक्रवारी चांगला पाऊस झाला. भावली धरण परिसरात 24 तासांत 120 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गंगापूरसह नाशिक व परिसरात चांगला पाऊस झाल्याने पावसाचे पाणी गोदावरीत येत असल्याने गोदावरी दुथडी वाहू लागली आहे.

काल सकाळी 6 वाजता संपलेल्या 24 तासांत गंगापूर धरणाच्या भिंतीजवळ 75 मिमी पावसाची नोंद झाली. नाशिकला 36, त्र्यंबक येथे 62,वालदेवी 31, गौतमी गोदावरी 20, अंबोली 54, वालदेवी 31 , कश्यपी 44 मिमी पावसाची नोंद झाली. नाशिक शहर तसेच नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍याच्या अंतरातील परिसरात जोरदार पाऊस झाल्याने गोदावरीत हे पाणी दाखल झाले.

शुक्रवारी सकाळी बंद केलेला गोदावरीतील विसर्ग पावसाचे पाणी येऊ लागल्याने पुन्हा शुक्रवारी 12 वाजता 1614 क्युसेकने सोडण्यास सुरुवात झाली. काल सकाळी 2421 क्युसेकने सुरू असलेला विसर्ग काल दुपारी 12 ते 4 या दरम्यान 6456 क्युसेक इतका करण्यात आला. नंतर 5 वाजता तो 4842 इतका कमी करण्यात आला. तर काल सायंकाळी 6 ते 8 वाजता तो 2421 क्युसेक इतका आणण्यात आला.

पावसाच्या पाण्याची आवक दूरवरून होत असल्याने आज रविवारी सकाळपर्यंत नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यातून विसर्ग सुरू राहील. नांदूरमधमेश्‍वर बंधारा 100 टक्के भरलेल असल्याने वरून पावसाच्या येणार्‍या पाण्याचा खाली विसर्ग केला जात आहे. गोदावरीचे हे पाणी काल सायंकाळी 8.30 वाजता शिंगवे येथे होते. रात्रीतून ते पुणतांब्यात दाखल झालेले असेल. गोदावरीतील हा विसर्ग धरणांच्या पुर्वेकडील ओढे, नाले तसेच नाशिक शहर यांच्या पावसावर सध्या अवलंबून आहे. धरणातून नदीसाठी अद्यापही विसर्ग नाहीच. गंगापूर धरण 46.55 टक्के इतके भरले आहे.

दारणा धरणाच्या परिसरात काल सकाळी संपलेल्या 24 तासांत दमदार पाऊस झाला. दारणाच्या भिंतीजवळ 62 मिमी पावसाची नोंद झाली. घोटी येथे 12 मिमी, इगतपुरीला 73 मिमी, भावली येथे सर्वाधिक 120 मिमी पावसाची नोंद झाली. कडवा येथे 61 मिमी, असा पाऊस नोंदला गेला भावलीचा साठा 27.55 टक्के इतका झाला आहे. दारणात 50 टक्के पाणीसाठा आहे. यातून 1100 क्ुयसेकने पाणी गोदावरी कालव्यांच्या तसेच जलद कालव्यासाठी सोडले जात आहे.

कालव्यांच्या लाभक्षेत्रातील पाऊस
काल सकाळी 6 वाजता संपलेल्या 24 तासांत मधमेश्‍वर येथे 57, देवगाव 40, ब्राम्हणगाव 15, कोपरगाव 7, पढेगाव 60, सोमठाणा 20, कोळगाव 6, शिर्डी 6, राहता 12, रांजणगाव 11, चितळी 46 मिमी, असा पाऊस नोंदला गेला. काल दुपारनंतरही लाभक्षेत्रात भिजस्वरुपाचा पाऊस झाला. अकोले 155 (27.99), संगमनेर 148 (36.78), कोपरगाव 179 (38.87), श्रीरामपूर 246 (44.96), राहुरी 181.8 (35.66), नेवासा 135 (27.71), राहाता 95 (19.3), नगर 100 (18.12), शेवगाव 98 (18.61), पाथर्डी 41 (7.53), कर्जत 110 (20.97), श्रीगोंदा 66.5 (13.76), जामखेड 87 (13.52), पारनेर 155 (37.27) असा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या