Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पूर्वमोसमी पावसाच्या सरी

Share

सिन्नर/बेळगाव कुऱ्हे | वार्ताहर

गेल्या दोन दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यानंतर आज दुपारी बारा वाजेच्या सुमार सिन्नर तालुक्यातील विंचुरी दळवी आणि इगतपुरी तालुक्यातील बेळगाव कुऱ्हे परिसरात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या.

हवामान खात्याने मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. नाशिक जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. सर्वत्र पावसाचे वातावरण असून काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्याने त्या परिसरातील नागरिकांना उन्हाच्या उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

इतरत्र मात्र, अजूनही उकाडा जाणवत आहे. दरम्यान,  हा मान्सून पूर्व पाऊस असल्याची माहिती हवामान तज्ञांनी दिली आहे. मान्सून केरळात दाखल झाला असून अजून आठ ते दहा दिवसांनी  महाराष्ट्राच्या वेशीवर येणार असलायचे सांगितले जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!