ञ्यंबकेश्वरला मुसळधार पाऊस सुरूच

0

     शहर आणि तालुक्यात काल शनिवारी सकाळ पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. ञ्यंबकेश्वर येथे काल शनिवारी सकाळ पर्यंत 60 मीमी पावसाची नोंद झाली होती या मोसमातील हा पहिलाच जोमदार पाऊस असल्याने शेतकरी सुखावला आहे.पहिल्या टप्प्यात पेरण्या झालेली भातांची पुनर्लागवड(आवणी) सुरू होण्यास मदत होणार आहे.

     ञ्यंबक शहरात पावसाची संततधार सुरू असल्याने भाविकांची तारांबळ झालेली पाहावयास मिळाली.शनिवार,रविवार आणि सोमवार अशा सलग सुटयांचा हंगाम आल्याने दर्शनार्थी भाविकांची संख्या वाढलेली आहे.

शहरात गर्दी असतांना रस्त्यारस्त्यावर पाणीच पाणी झाले होते वाहनांची दाटी त्यात अशी बिकट परिस्थिती झाल्याने मंदिर परिसरात मार्ग काढणे भाविकांना कठिण झाले होते.ञ्यंबक पालिकेने यावर्षी नालेसफाई प्रभावीपणे केलेली नाही याचा परिणाम गटारी तुंबून पाणी रस्त्यावर आलेले सर्वत्र पहावयास मिळाले आहे.

ञ्यंबक तालुका दुर्गम भागात विस्तारलेला आहे.घाटमाथ्याचे आणि वळणावळणांचे रस्ते यामध्ये दरडी कोसळण्याचा धोका असतो.गतवर्षी पावसाळयात हरसुल घाटात बिकट गंभिर परिस्थिती निर्माण झाली होती.सार्वजनीक बांधकाम खात्याने हात झटकल्याने महसुल खात्याने स्वखर्चाने घाटातील रस्त्यावर आलेला मलबा दुर केला व वाहतुक सुरळीत केली मात्र सार्वजनीक बांधकाम विभागाने वर्षभर याकामाकडे दुर्लक्ष केले.

दरम्यान यावर्षी देखील तालुक्यातील पुलांची आणि रस्त्यांची परिस्थिती पाहणी सांगण्यास टाळाटाळ केली आहे.प्रांताधिकारी राहुल पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन बैकठीत स्पष्ट सुचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे या बैठकीस जबाबदार पदावर असलेले अधिकारी गैरहजर होते.यावर्षी रस्ते आणि पुलांच्या बाबत काही प्रसंग उदभवल्यास संबंधीत अधिका-यांच्या विरूध्द कठोर कारवाईचे संकेत आहेत.

LEAVE A REPLY

*