सुरगाण्यात संततधार; दुबार पेरणीचे संकट टळले

0

सुरगाणा (प्रतिनिधी) ता. १४ : तालुक्यात गुरुवार रात्री पासून पावसाची संततधार  सुरू आहे. त्यामुळे नदी, नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहू लागले आहेत.

चांगल्या पावसामुळे भात लावणीला जोर आला आहे. तर शेतकऱ्यांचे दुबारपेरणीचे संकट टळले आहे.

तालुक्यातील नार, पार, अंबिका, वाझळी, कादवा, गिरणा या केंम पर्वतवरून उगम पावणाऱ्या नद्यांसह तान, मान , कावेरी या नदया तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे नदी काठावरच्या भात शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे.

तालुक्यात पाच ठिकाणी पर्जन्यमापक केंद्र  आहे. त्यावर पुढीलप्रमाणे पावसाची नोंद झाली. सुरगाणा : 111 मिमी, बोरगांव :108 मि.मी., उंबरठाण: 90.8 मिमी, मनखेड: 93.7 मिमी., बारे 83.5 मिमी. आज सुरगाणा तालुक्याची एकूण सरासरी 97.4 मि.मी. नोंद झाली.

तालुक्यात अजूहनी पावसाचे वातावरण असून पावसाची रिपरीप सुरूच आहे. हिरिडपाडा-बोरगांव गिरणा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

*