Friday, April 26, 2024
Homeनगरबाप्पासोबत पावसाची दमदार हजेरी

बाप्पासोबत पावसाची दमदार हजेरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

खंडानंतर नगर जिल्ह्यात गणेश चतुर्थी (बुधवारपासून) जोरदार ऐन्ट्री झाली आहे. जिल्ह्यात बाप्पांच्या आगमानाच्या दिवशी पावसाने जवळपास सर्वदूर हजेरी लावली. यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटांसह विजांच्या कडकडाट अतिवृष्टी झाली आहे. यात नेवासा बुद्रूक आणि टाकळीभान (श्रीरामपूर) या महसूल मंडलात प्रत्येकी 158 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून उर्वरित तीन महसूल मंडलात 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना ऐनवेळी दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पेरण्या झालेल्या आहेत. मात्र, मागील 15 दिवसांत कडक उन्हामुळे पिके तहानली होती. त्यांना पावसाची प्रतिक्षा होती. पावसाची ही प्रतिक्षा गणपत्ती बाप्पांनी भागवली असून त्यांच्या सोबत ते पावसाला घेवून आल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाली असून ऐन मोक्याच्या क्षणी पिकांना जीवदान मिळाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 76 टक्क्यांच्या सरासरीने 427 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

तर मुळा, भंडारदर आणि निळवंडे धरणातील पाण्याची स्थिती चांगली आहे. अशा परिस्थिती जिरायत भागातील पिके पाण्यासाठी तहानला होती. मात्र, बुधवारी सायंकाळनंतर जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला असून यात काही ठिकाणी धोधो पावसाची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे.

जिल्ह्यात बुधवारी झालेल्या मंडलनिहाय आकडेवारीत नगर तालुक्यात नालेगाव 26, केडगाव 39, नागापूर 52, वाळकी 21 मिलीमीटर. पारनेर तालुक्यात पारनेर 66, भाळवणी 39, वाडेगव्हाण 35, वडझीरे 35, निघोज 40, टाकळी ढोकेश्वर 74, पळशी 37 मिलीमीटर. श्रीगाेंंदा तालुक्यात श्रीगोंदा 36, काष्टी 35, बेलवंडी 49, पेडगाव 71, चिंभळा 61, देवदैठण 27, कोळगाव 32 मिलीमीटर. कर्जत तालुक्यात राशिन 31, भांबोरा 48 मिलीमीटर. जामखेड तालुक्यात अरणगाव 35. नान्नज 26 मिलीमीटर. पाथर्डी तालुक्यात टाकळी 26, कोरडगाव 45 मिलीमीटर.

नेवासा तालुक्यात नेवासा खुर्द 28, नेवासा बुद्रुक 158 मिलीमीटर. राहुरी तालुक्यात राहुरी 27, सात्रळ 39, ताराबाद 42, देवळाली 20, टाकळीमियॉ 27, वांबोरी 26 मिलीमीटर. संगमनेर तालुक्यात संगमनेर 35, धांदरफळ 89, आश्वी 53, शिबलापूर 46, तळेगाव 39, समनापूर 47, घारगाव 54, साकूर 116 मिलीमीटर. अकोले तालुक्यात अकोले 89, वीरगाव 102, समशेरपूर 78, साकीरवाडी 81, राजूर 64, शेंडी 64, कोतुळ 78, ब्राम्हणवाडा 76 मिलीमीटर. कोपरगाव तालुक्यात कोपरगाव 31, रवांदे 58, सुरेगाव 83, दहिगाव 35, पोहेगाव 109 मिलीमीटर. श्रीरामपूर तालुक्यात श्रीरामपूर 69, बेलापूर 62, उंदिरगाव 38, टाकळीभान 158 मिलीमीटर. राहाता तालुक्यात राहाता 64, शिर्डी 80, लोणी 70, बाभळेश्वर 92, पुणतांबा 42 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनूसार जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झालीची नोंद आहे. यात फक्त काही ठिकाणी त्यांचे प्रमाण कमी जास्त आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन पिकाला मोठे जीवदान मिळालेले आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून त्याला विहीरीतून पाणी देणे अडचणीचे झाले होते. यामुळे शेतकर्‍यांना पावसाची प्रतिक्षा होती. या पावसामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या