पांजरेत 2 इंच पाऊस

0
भंडारदरा (वार्ताहर) – उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटातील पांजरे व भंडारदरात मृग नक्षत्राच्या जोरदार सरी कोसळल्या. शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत जोरदार पाऊस झाला. त्याची पांजरेत 54 तर भंडारदरात 31 मिमी पावसाची नोंद झाली.
या पावसाने आठवडे बाजारात हाल झाले. घाटघरला अद्याप पावसाने फारसा जोर पकडलेला नाही. रविारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास 1 तास जोरदार सरी कोसळल्या. त्याची नोंद 14 मिमी झाली आहे.अकोलेच्या काही भागातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतीकामांना वेग आला आहे. अकोेलेतील कुंभेफळसह अन्य भागात, राहुरी, नगरमध्येही मुसळधार पाऊस झाला.

LEAVE A REPLY

*