Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

घोटी : रामरावनगर परिसरात रेल्वे रुळाला तडे; मोठा अनर्थ टळला

Share

जाकीर शेख | घोटी

इगतपुरी तालुक्यातील घोटी परिसरातील रामरावनगर भागातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे रुळाला तडे गेल्याची घटना घडली. आज सकाळी मंगळवारी साडेनऊच्या दरम्यान या भागातून कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर या मार्गावरील रेल्वे वाहतूक थांबवून मोठा अनर्थ कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने टळला आहे.

घोटी परिसरातील रामराव नगर भागातून मध्य रेल्वेचे रूळ गेले आहेत. रेल्वेचे कर्मचारी भूषण गुप्ता, राजेंद्र गोडे, विजयकुमार सूर्यवंशी, अर्जुन सानप हे साडेनऊच्या दरम्यान या भागातून जात असतांना मुंबईकडे जाणाऱ्या रुळावर मोठा तुकडा पडून तुटला असल्याचे त्यांना समजले.

या कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत वरिष्ठांना याप्रकरणी माहिती दिली. सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी जाणारी सेवाग्राम एक्सप्रेस यामुळे रोखण्यात आली.

रेल्वे रूळाला तडे गेल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. संभाव्य अपघात होण्यापासून रोखण्यात रेल्वे यंत्रणेला यश आले.

दरम्यान, तुटलेल्या रुळाला तात्पुरते जोडले गेले असून खोलंबलेली वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.  वाहतूक सध्या संथ वेगाने दहा मिनिटे उशीराने धावत असल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेमुळे या गाडीचा संभाव्य अपघात सुदैवाने टळला. वरिष्ठांच्या सूचनेनुसार तुटलेल्या रुळाला तात्पुरते जोडण्यात आले. गाड्या आता दहा मिनिट उशिराने संथ धावत आहेत. दुपारपर्यंत रुळावर भक्कम काम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!