Thursday, May 2, 2024
Homeनगररेल्वे स्टेशनला पाणीबाणी

रेल्वे स्टेशनला पाणीबाणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रेल्वे स्टेशन प्रभाग क्रमांक 15 मधील बोहरी चाळ, संभाजी कॉलनी येथे अत्यंत कमी दाबाने व मैलामिश्रित पाणीपुरवठा होत असून, अनेक घरातील नागरिक आजारी पडले आहेत.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर किमान नागरिकांना पिण्यासाठी शुध्द पाणी मिळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादीच्या वतीने माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना दिले.

यावेळी संभाजी पवार, महेश सुपेकर, विजय गायकवाड, पप्पू शेख, महेश अल्हाट, निखिल गायकवाड, गणपत वाघमारे, सचिन वाघमारे, भाऊ चौधरी, महालू शिपणकर, समीर शेख, संजू जरबडी, प्रवीण औटी, बाळू ठाणगे, हिरा पाडळे, भारत कदम आदीसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रेल्वे स्टेशन परिसरामध्ये शिवनेरी चौक या परिसरात काही वर्षापूर्वी टाकण्यात आलेल्या जलवाहिन्या निकामी झाल्या असून, ते पूर्णपणे सडल्या आहेत. त्यामध्ये ड्रेनेज लाईनचे पाणी जात आहे. या परिसरात मैलामिश्रित पाणी पुरवठा होत असल्यामुळे त्या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत पालिका प्रशासनाला वारंवार तक्रार करून देखील यावर कुठलीच कार्यवाही होत नसल्याने अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

बोहरी चाळ, संभाजी कॉलनी परिसरामध्ये दिवसाआड अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे परिसरातील रहिवाशांना पाणी मिळत नाही. तसेच मागील एक ते दीड महिन्यापासून पाणीपुरवठा विस्कळीत झालेला असून, सुरुवातीला अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. परंतु मागील पंधरा दिवसांपासून या परिसरात काही रहिवाशांना पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या