1 लाख 36 हजार कोटींचे प्रकल्प : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू

0

शिर्डी-मुंबई सुपरफास्ट सुरू

शिर्डी (प्रतिनिधी)– देशात रेल्वेच्या विकासाला गती देण्याबरोबरच महाराष्ट्रात रेल्वेच्या विकासासाठी 1 लाख, 36 हजार कोटी रुपयांचे विविध प्रकल्प सुरू आहेत, राज्यात रेल्वेचे जाळे वाढविण्यावर भर देणार असल्याचे सांगतानाच रेल्वेच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले.
शिर्डी रेल्वे स्थानकावर विविध उपक्रमाचे उद्घाटन तसेच साईनगर शिर्डी ते मुंबई साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस गाडीचा शुभारंभ शिर्डी रेल्वे स्थानकावर प्रभू यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, रोजगार हमी योजना आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल, नगराध्यक्षा योगिता शेळके, खासदार सदाशिव लोखंडे, साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल, मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा आदी उपस्थित होते.
श्री. प्रभू म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर दिला आहे. प्रवाशांना स्वस्तात पिण्याचे पाणी, रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. देशभरातून लोक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला येतात. त्यांच्यासाठी विविध सुविधा दिल्या पाहिजेत. त्यासाठीच रेल्वेच्या माध्यमातून शिर्डी येथे अनेक सोई सुविधांच्या उभारणीवर भर देण्यात येत आहे. श्री. प्रभू म्हणाले, रेल्वे विभागात आलेल्या प्रत्येक पत्र, निवेदनाची दखल घेतली जाते. जे काम होण्यासारखे आहे ते तात्काळ मार्गी लावले जाते तर प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी गतीने प्रयत्न केले जातात. यावर्षी 810 कोटी लोकांनी रेल्वेने प्रवास केला असून, एका दिवसाला अडीच ते तीन कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असल्याने सोईसुविधांच्या वाढीवरही भर देण्यात येत आहे.
यावेळी रेल्वेमंत्री श्री. प्रभू यांच्यासह उपस्थित मान्यवरांचे हस्ते शिर्डी ते मुंबई साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस गाडीचा शुभारंभ शिर्डी रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. पादचारी पूल,फ्लॅट क्रमांक 2, वॉटर वेडिंग मशिन, स्थानकांना जोडणार्‍या रस्त्यात सुधारणा, साईनगर शिर्डी आणि सोलापूर विभागातील इतर मोठ्या स्थानकावर रोकड रहित कामकाज, सोलापूर विभागातील महत्वाच्या स्थानकावरील 20 वॉटर वेंडिंग मशिनचे लोकार्पण तसेच साईनगर शिर्डी स्थानकावरील प्रवासी सुविधा कामांचा शुभारंभ करण्यात आला. महाप्रबंधक डि.के. शर्मा यांनी प्रास्ताविक केले. खासदार सदाशिव लोखंडे यांचे भाषण झाले.

चारीधामसाठी रेल्वे – जीवनामध्ये चार धाम यात्रा यशस्वी व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासंदर्भातही रेल्वेने सर्वेक्षण सुरु केले रेल्वेच्या कार्यपद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला असल्याचे श्री. प्रभू यांनी सांगितले. 

 

 

LEAVE A REPLY

*