जनरल डब्ब्यातील प्रवाशांसाठी खुशखबर; मोबाईल अॅपद्वारे होणार तिकीट बुक

0
जनरल डब्ब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे लवकरच खुशखबर देण्याच्या तयारी आहे. आता एका क्लिकवर अनारक्षित तिकीट बुक करता येणार असून यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज  नाही.

रेल्वेने आता युटीएस नावाचे मोबाईल अप्लिकेशन विकसित केले असून याद्वारे तिकीट बुक केल्यानंतर प्रवाशांना व्हेंडिंग मशिनच्या माध्यमातून तिकीट घेता येणार आहे.

तिकीटघरांवर होणारी मोठी गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला असून प्रायोगित तत्वावर दिल्लीतील काही स्थानकांना जोडण्याचे कामदेखील सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या अॅपद्वारे घरबसल्याही अनारक्षित तिकीट काढता येणार असल्यामुळे प्रवाशांसाठी ही गुड न्यूज आहे. सध्या जरी दिल्लीत हि सुविधा सुरु करण्यात आली असली तरी लवकरच रेल्वे याबाबत निर्णय घेण्याची शक्यता असून सगळीकडे या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

रेल्वेची चाचणी अंतिम टप्प्यात असून याबाबत रेल्वे लवकरच अपडेटेड वर्जन विकसित करून इतर रेल्वेस्थानकांना जोडणार असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.

LEAVE A REPLY

*