रेल्वेवर दरोडा; दोघांना अटक

0

श्रीगोंद्यातील एकाचा समावेश

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेवर दगडफेक करून प्रवाशांची दीड लाखाची लूट करणार्‍या दरोडेखोरांच्या टोळीतील दोघांना पवारवाडी (लिंपणगाव, ता. श्रीगोंदा) शिवारात सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
एकनाथ माहिर्‍या पवार (रा. भगतवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर), तुटकस ज्ञानेश्‍वर चव्हाण (रा. पवारवाडी, ता. श्रीगोंदा) या दोन आरोपीना अटक करून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीमध्ये श्रीगोंद्यातील एकाचा समावेश असल्याने चर्चेला उधाण आले आहे.
दिनांक 27 ऑक्टोबर रोजी रात्री घटना घडल्यानंतर पोलीस आरोपीच्या मागावर होते. दरम्यान हा गुन्हा करमाळा तालुक्यातील भगतवाडी येथील आरोपींने केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पो. उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या आदेशाने व पो. निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.अंकुश ढवळे यांनी या गुन्हेगारांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
करमाळा तालुक्यातील भगतवाडी येथील आरोपी हे नेहमीच काष्टी रेल्वे स्थानकाजवळ असे लुटीचे गुन्हे करत असून त्यांचे श्रीगोंदा तालुक्यातील पवारवाडी येथे नातेवाईकांकडे येणे जाणे असल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलिसांना दोन दिवसांपूर्वी गुप्त बातमीदारामार्फत हे आरोपी लिंपणगाव शिवारात दुचाकीवरून जात असल्याची माहिती समजली.
त्यानुसार श्रीगोंदे उपनिरीक्षक महावीर जाधव पो. कॉ बोराडे, राऊत पो. हे. कॉन्स्टेबल अंकुश ढवळे यांनी सदर पवारवाडी शिवारात जाऊन तपास केला असता पोलिसांना पाहून हे आरोपी पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करून दोघांनाही पकडले. त्यांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या गुह्यातील दोन संशयित आरोपी पवारवाडी शिवारात येणार असल्याची माहिती पोलिीस नाइक अंकुश वळे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या पथकाने सापळा रचून दोघाना ताब्यात घेतले. यातील एक आरोपी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा परिसरातील तर दुसरा पवारवाडी (श्रीगोंदा) येथील आहे. या दोन्ही संशियताना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*