Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

सावधान! रेल्वे रूळ ओलांडला तर यमराज तुम्हालाही उचलून घेऊन जाऊ शकतो

Share

मुंबई | प्रतिनिधी 

एखाद्या मोठ्या प्रसंगातून जीव वाचल्यानंतर, साक्षात यमंच समोर होता असं आपण अनेकांच्या तोंडून ऐकलं असेल. आज दिवसभर चर्चा होती ती यमराजाची. मुंबईत पश्चिम रेल्वेच्या मार्गावर कुणी बेकायदेशीर धोका पत्करून रेल्वे रूळ ओलांडत असेल तर त्याला चक्क यमराज पकडून घेऊन जात होते.

पश्चिम रेल्वेच्या आरपीएएफ जवानांनी एक जनजागृती मोहीम राबवली होती. या मोहिमेअंतर्गत नागरिकांनी रेल्वे रूळ ओलांडू नये याबाबत जनजागृती करण्यात आली. या जनजागृतीचा एक भाग म्हणून एका व्यक्तीने यमराजची वेशभूषा करून रेल्वे रूळ न ओलांडण्याबाबत प्रवाशांमध्ये जनजागृती केली. इतकंच नाही तर रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या या व्यक्तीला या यमराज खांद्यावर उचलून घेऊनही गेला.

पश्चिम रेल्वेने केलेल्या ट्विटनुसार, हे यमराज आहेत नजर ठेऊन जीव वाचवतात. रूळ ओलांडल्याने उद्भवणाऱ्या धोक्याबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी ही जागरूकता मोहीम राबवण्यात आली होती.

2018 मध्ये रेल्वे अपघातांत दरदिवशी 7 जणांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे एका अहवालात समोर आले होते. तर 1417 रूळ मुंबईकरांचा रूळ ओलांडताना बळी गेला आहे. रेल्वे प्रवाशांचा रूळ ओलांडताना किंवा ट्रेनमध्ये लटकत असताना पडून मृत्यू होऊ नये यासाठी मालाड, गोरेगाव आणि इतर काही स्टेशनांवर ही मोहीम राबवण्यात आली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!