रेल्वेत दागिने चोरणार्‍या महिलेला अटक

0
नाशिकरोड | दि. २७ प्रतिनिधी- रेल्वे गाडीत बसत असताना एका महिला प्रवाशाची दागिने असलेली बॅग लांबविणार्‍या महिला चोराला रेल्वे पोलीसांनी शिताफीने अटक केली. तिच्याकडून चोरीचा एक लाख ७८ हजाराचा एवज जप्त करण्यात पोलीसांना यश आले. याबाबतचे वृत्त असे की, काल (दि. २७) सकाळी गोयगोल या मुंबई हावडा गीतांजली डाऊनने नाशिक ते अकोला प्रवास करण्यासाठी नाशिकरोड रेल्वेस्टेशनवर आल्या.

महिला बोगीत चढत असताना त्यांच्या गळ्यातील बॅग महिला चोराने लांबवली. गोगोल या मदतीसाठी हाका मारत असताना हवालदार संजय केदारे तेथे आले. लहान मूल कडेवर असलेल्या व मरुन रंगाचा सलवार कुर्ता घातलेल्या महिलेने पर्स चोरल्याचा संशया तिने व्यक्त केला. केदारे यांनी त्वरित संशयिताचा पाठलाग केला.

प्लॅट फार्म क्रमांक दोनवरील सिंहस्थ पुलावरुन ही महिला पळून जात असताना केदारेंनी तीला तिकीट बुकींग आफीसमागे पकडले. त्यानंतर तिची चौकशी केली असता तिचे नाव राणी क्रांती भोसले (२५), रा. औरंगाबाद सरकारी हास्पिटलजवळ) असे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. महिलेला पोलीस ठाण्यात आल्यानंतर झडती घेतली असता तिच्याकडे वरील ऐवज आढळून आला.
पोलिसांनी जप्त केलेल्या ऐवजामध्ये सोन्याच्या तीन तोळ्याच्या बांगड्या, एक तोळ्याचा हार, तीन ग्रॅमची अंगठी तसेच रोख ३७ हजार रुपये यांचा समावेश आहे. सहाय्यक निरीक्षक नितीन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक व्ही. बी. भोये, हवालदार संजय केदारे यांनी ही कारवाई केली.

दरम्यान रेल्वे प्रवाशांच्या बॅगा चोरण्याचे प्रकार नेहमीच घडतात. या अगोदरसुद्धा प्रवाशांना गुंगीचे चॉकलेट देऊन त्यांच्याजवळील ऐवज लांबविण्याचे प्रकार घडले आहेत. अटक करण्यात आलेल्या महिलेकडून आणखी चोर्‍या उघडकीस येण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*