चाळीसगावात दोन सोशल क्लबवर छापे

चाळीसगाव – 

शहराच्या विविध भागात चालणार्‍या एकुण चार सोशल क्लबवर अप्पर पोलीस अधीक्षक, डि.वाय.एस पी., शहर पोलीस स्टेशन, ग्रामीण पोलीस स्टेशन आणि मेहूणबारा पोलीस स्टेनशच्या संयुक्त पथकाने एकाचवेळी छापे टाकल्यानंतर दोन क्लबवर पोलिसांना दिड लाखांच्या मुद्देमालासह एकुण 59 जणांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान नारायणवाडी भागातील सोशल क्लब चालकांना छाप्याची पूर्वसुचना असल्याने त्यांनी त्याआधीच आपला गाशा गुंडाळला होता तर अन्य एक सोशल क्लब बंद होता. या कारवाईमुळे चाळीसगावात एकच खळबळ उडाली आहे.

चाळीसगावात सोशल क्लबच्या नावाखाली चालणार्‍या दोन जुगार अड्ड्यांवर चाळीसगाव पोलिसांनी धाडी टाकून झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळणार्‍या 70 जणांना अटक केली त्यांच्याकडून सुमारे 1लाख 46 हजार 200 रूपयांची रोकड व पत्याचे कॅट तसेच जुगाराची साधने जप्त केली.

एकाच रात्री दोन ्नलबवर धाडी टाकल्याने शहरासह तालु्नयात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही ्नलबर दोन महिन्यापूर्वीही धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यांच्यावर कारवाई होवूनही पुन्हा जुगार खेळतांना कारवाई करण्यात आल्याने चर्चेला उधान आले आहे.

दुध एरीया भागात टाकलेल्या छाप्यात 11 तर बस स्थानकाजवळील जुगार अड्डयावर टाकलेल्या छाप्यात 48 अशा 59 जणांना अटक करण्यात आली आहे. शहरात एकाच वेळी अशा प्रकारची कारवाई पहिल्यांदाच झाली आहे.

जुगारींमध्ये चाळीसगावसह उत्तर प्रदेश, बिहार, कन्नड, औरंगाबाद, मालेगाव, मुंबई, ठाणे येथील जुगारींचा समावेश आहे.  याप्रकरणी विनोद नानाजी काकडे, मौलीनगर, मनमाड, प्रकाश वसंतराव वाबळे, मुक्ताईनगर कॉलनी, मलकापूर, विजय केदू निमसे, रमाबाई आंबेडकर नगर, मनमाड, प्रेमशंकर गणेशीलाल धीमर, विरमपूर, कडोली, अलीगड उत्तरप्रदेश, लालचंद नारायणदास रत्नानीख राजा बजाज कॉलनी, औरंगाबाद, आनंद दगडू चव्हाण, मेहूणबारे, तुकाराम सुकलाल चव्हाण, जिंगरवाडी, चाळीसगाव, शेरखान रमजान खान, पंचशीजनगर, चाळीसगाव, विष्णु गणेशीलाल, विरमपुर थाना लोधा तहसील गभाना अलीगड उत्तरप्रदेश, राहूल राजेंद्र परदेशी, निमगाव, मालेगाव, अब्दुल वाहीद मोहम्मद सिद्धी, संगमेश्वर, मालेगाव, विजय हिलालसिंग पाटील, बोहार्डी, ता. भुसावळ, राजेंद्र कौतीक पाटील, पिलखोड, जगन्नाथ बंडू कोठावदे, एमजीनगर, चाळीसगाव, अशपाक अहमद जमील, श्रावस्तीनगर, नांदगाव, संदीप गंगाराम शिंपी, जहागिरदारवाडी, चाळीसगाव, संदीप विक्रम पाटील, उपखेड, शकील खान अकबर खान, कैसर कॉलनी,जिन्सी, औरंगाबाद, जाकीर शेख साबीर शेख, रमजान कॉलनी, औरंगाबाद, चंद्रभान वामन चौधरी, शिवशक्तीनगर, चाळीसगाव, राजेंद्र मेघराज अग्रवाल, संगमेश्वर, मालेगाव, नाशिर मजीदखान, कटकट गेट, मसुद कॉलनी, औरंगाबाद, सुरेश काशीनाथ शर्मा, मेन रोड, मालेगाव कॅम्प, विलास शिवाजी पाटील, संगमेश्वर, मालेगाव, सैय्यद इ्नबाल उस्मान कादरी, चंदन कोळीवाडा, ठाणे, सुभाष पुनमचंद जैन, सावता नगर, मालेगाव, जफ्फार हुसेन करार,सिटीचौक, औरंगबाद, नथ्थुराम जगजी पटेल, लक्ष्मीनगर, चाळीसगाव, मोहन रघुनाथ चौधरी, चौधरी वाडा, चाळीसगाव, विष्णु लक्ष्मण वाघ, मलकापूर, बुलढाणा, योगेश आत्माराम चौधरी, सरस्वती कॉलनी, कन्नड, युसूफ खान फकीर मोहम्मद, नांदगाव, नाशिक, गोकुळ त्र्यंबक चौधरी, वैभव मंगल कार्यालयजवळ,चाळीसगाव, मोहम्मद युसूफ मोहम्मद अयुब, मोमीनपुरा, मालेगाव, गणपत दयाराम चौधरी, आखातवाडे, ता. पाचोरा, शेख शफीक शेख आसीफ, कमलपुरा, मालेगाव, अब्बास मकबुल बागवान, नेवासा खुर्द, ता. नेवासा, अफजल बाबुलाल पठाण, नेवासा खुर्द ता. नेवासा, दत्तु विठ्ठल पाटील, नेताजी चौक, चाळीसगाव, मनोज मेघल पंडीत, मधुपुर, पो. गगतपुर, ता. चकाया, जि.जमुनी, बिहार, सत्यनारायण देवीप्रसाद मिश्रा, सिद्धी विनायक कॉलनी, चाळीसगाव, राजेंद्र छोटु मंडळ, सरिया खुर्द, जिल्हा गिरडोह, झारखंड, अनिल देवसिंग राजपूत, जहागिरदारवाडी, चाळीसगाव, शकील अहमद मुस्तफा, रोनकाबाद, मालेगाव, जमील अहमद मोहम्मद इद्रीस, रविवारवाडा मालेगाव व संजय विश्राम राठोड, पिंपरखेड, ता. चाळीसगाव अशा 48 जणांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून 96 हजार 300 रूपयांची रोकड जप्त केली. त्यांच्या विरोधात हवालदार बापुराव भोसले यांच्य फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायदा कलम 12 अ, 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव हे करीत आहेत.

दुसरी कारवाई पोलीसांनी शहरातील दुध डेअरी भागातील जुगार अड्ड्यावर केली. येथे गुरुवारी रात्री 8 वाजता अप्पर पोलीस अधीक्षेक सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी कैलास गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष रोही व डीवायएसपी तसेच शहर पोलीस ठाण्यातील पोलीसांच्या पथकाने छापा टाकला असता भारतीय क्रीडा संस्था, जळगाव उपशाखा चाळीसगाव  या संस्थेत सोशल ्नलबच्या नावाखाली झन्नामन्ना नावाचा जुगार खेळतांना 11 जुगारी मिळून आले.

त्यांच्याकडून पोलीसांनी रोख 49 हजार 900 रूपये व पत्याचे कॅट तसेच सट्टा जुगाराची साधने जप्त करण्यात आली. जुगार खेळणार्‍या संजय बाळासाहेब देशमुख, रांजणगाव, सुनील अंबरसिंग पवार, जहागिरदारवाडी, चाळीसगाव, महेंद्र दामोदर सोमासे, मालेगाव, नितीन भिमराव जाधव, मालेगाव, सत्यनारायण जयगोपाल, विक्रोळी, मुंबई, गणेश दामोदर सोनवणे, मालेगाव, अण्णा सुकदेव केदार, कोळगाव, रमेश वाल्मीक मांडोळे,  फुले कॉलनी, चाळीसगाव, सचिन पांडुरंग सुर्यवंशी, अदिलशहा युनुसशहा, घाटरोड, चाळीसगाव, सुरेश गुलाबराव देशमुख, जयबाबाजी चौक, चाळीसगाव यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात पोना गणेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायदा कलम 12 अ, 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष रोही हे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com