राहुरी शहरासाठी ‘मुळा’ तून वाढीव पिण्याचे पाणी मंजूर

0
राहुरी (तालुका प्रतिनिधी)- राहुरी शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण होत असल्याने घरगुती पाणी वापराकरीता मुळा धरणातून राहुरी नगर परिषदेसाठी कायमस्वरूपी बिगर सिंचन वाढीव पाणी आरक्षणास जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे. मात्र यातून सिंचन क्षेत्राचे पाणी कमी होणार आहे.
राहुरी शहर वाढत आहे. लोकसंख्याही सातत्याने वाढत आहे. परिणामी आहे तेवढे पाणी कमी पडत आहे. त्यातून पाणीटंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे राहुरी नगरपरिषदेने मुळा धरणातून वाढीव पाणी मिळावे यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास मंडळाकडे पाठपुरावा केला होता. या पार्श्‍वभूमीवर बिगर सिंचन पाणी आरक्षण प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी क्षेत्रिय वाटपाच्या मर्यादेनुसार सुधारित स्तर निश्‍चित करण्यात आलेले आहे. राहुरीसाठी सन 2031 ची लोकसंख्या विचारात घेऊन 0.86 दलघमी वाढीव पाणी आरक्षणास काही अटींवर मान्यता देण्यात आली आहे.
बिगर सिंचन पाणीवापराचे करारनामे व नुतनीकरण वेळेवर करण्याबाबत मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही होणार आहे. जलस्त्रोत प्रदुषित करणार्‍या पाणी वापरकर्त्यांकडून दंडनीय पाणीपट्टी आकारणी करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली ओहत. तसेच अटींचे पालनाची जबाबदारी वापरकर्त्यांवर बंधनकारक आहे. दरम्यान, वाढीव पाणी मंजूर करण्यात आल्याने राहुरीकरांना दिलासा मिळाला आहे.

 

LEAVE A REPLY

*