ऊस दरासाठी ‘स्वाभिमानी’चा राहुरीत रास्ता रोको

0

राहुरी स्टेशन (वार्ताहर) – जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने उसाला प्रतीटन 3400 रुपये भाव जाहीर करीत नाही तोपर्यंत ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी उसाला कोयता लावू देऊ नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले. दरम्यान, दोन दिवसात निर्णय न घेतल्यास पालकमंत्री व साखर कारखानदारांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा देण्यात आला.

 

काल सकाळी राहुरी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने नगर – मनमाड राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामास प्रारंभ झाला आहे.

 

मात्र, कोणत्याही साखर कारखान्याने अद्याप ऊस दर जाहीर केला नाही. या सर्व कारखान्यांनी त्वरीत प्रती टन 3400 रुपये भाव जाहीर करावा, तसेच उसाचे वजन कमी येत असल्याची शेतकर्‍यांची भावना असल्याने कारखान्यांनी उसाचे वजन व त्यापोटी मिळणारे पेमेंट ऑनलाईन करावे व ऊसतोड झाल्यापासून 15 दिवसात पेमेंटची पसर्व रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यात जमा करावी, आदी मागण्या आंदोलक शेतकर्‍यांनी केल्या.

 

आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात काल राहुरीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. गुजरातमध्ये 4700 रुपये, उत्तरप्रदेशमध्ये 3500 रुपये प्रतीटन भाव दिला जातो. मग महाराष्ट्रात त्याप्रमाणे भाव का मिळत नाही? असा खडा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केला. दोन दिवसात प्रश्‍न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला.अंादोलनामुळे राज्यमार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागून बराच वेळ वाहतुकीची कोंडी झाली. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार यांनी स्वीकारले. पोनि. प्रमोद वाघ व त्यांच्या सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

 

आंदोलनात प्रकाश देठे, दिनेश वराळे, अ.भा. छावाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे, अरूण डौले, सुभाष वने, संग्राम धुमाळ, किशोर भिंगारकर, प्रविण पवार, सुनील इंगळे, सतीश पवार, सचिन म्हसे, संदीप खुरूद, सचिन पवळे, प्रशांत पवार, प्रमोद पवार, सचिन पवार, देवीदास करपे, संजय डौले, भगीरथ पवार आदी पदाधिकारी व ऊस उत्पादक सहभागी झाले होते.

 

 ऊस भावाची अद्यापही साखर कारखानदारांनी कोंडी केली आहे. उसाची शेती ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या जीवन-मरणाशी निगडीत असून त्यावरच ग्रामीण अर्थव्यवस्था आधारीत आहे. उसाच्या भरवशावर शेतकर्‍यांचे आर्थिक व्यवहार अवलंबून असल्याने साखर कारखान्यांनी उसाचा दर तातडीने जाहीर करावा. शेतकर्‍यांच्या भावनेशी खेळू नये, हे आंदोलन लोकशाही मार्गाने केले आहे. त्याची प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास राहुरीतच नव्हेतर संपूर्ण नगर जिल्ह्यात अ.भा.छावा संघटनेला शेतकरी संघटना बरोबर घेऊ0न प्रशासनाला कुठलीही पूर्वसूचना न देता कारखान्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल. यातूनच शेतकर्‍यांचा उद्रेक होऊन साखर कारखानदारांना उसाच्या टिपराला देखील हात लावू देणार नाही. ऊस भावाची अद्यापही साखर कारखानदारांनी कोंडी केली आहे. उसाची शेती ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या जीवन-मरणाशी निगडीत असून त्यावरच ग्रामीण अर्थव्यवस्था आधारीत आहे. उसाच्या भरवशावर शेतकर्‍यांचे आर्थिक व्यवहार अवलंबून असल्याने साखर कारखान्यांनी उसाचा दर तातडीने जाहीर करावा. शेतकर्‍यांच्या भावनेशी खेळू नये, हे आंदोलन लोकशाही मार्गाने केले आहे. त्याची प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास राहुरीतच नव्हेतर संपूर्ण नगर जिल्ह्यात अ.भा.छावा संघटनेला शेतकरी संघटना बरोबर घेऊ0न प्रशासनाला कुठलीही पूर्वसूचना न देता कारखान्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल. यातूनच शेतकर्‍यांचा उद्रेक होऊन साखर कारखानदारांना उसाच्या टिपराला देखील हात लावू देणार नाही.

देवेंद्र लांबे,  जिल्हा कार्याध्यक्ष, अ.भा.छावा संघटना.

LEAVE A REPLY

*