Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

राहुरी: मांजरीत तीन लाख 29 हजारांची दारू पकडली

Share

एक अटकेत; राज्य उत्पादन शुल्क खात्याची कारवाई

राहुरी (प्रतिनिधी)-  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या श्रीरामपूर विभागाच्या भरारी पथकाने (क्रमांक 2) राहुरी तालुक्यातील मांजरी शिवारातील एका हॉटेलवर दि. 18 च्या मध्यरात्रीनंतर 2 वाजण्याच्या सुमारास धडक कारवाई केली. यात तीन लाख 29 हजार 184 रुपये किमतीचे देशी-विदेशी दारूचे 74 बॉक्स हस्तगत करण्यात आले.

याप्रकरणी अशोक तुकाराम विटनोर यास अटक करण्यात आली असून या आरोपीविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ), (ई) 80(1) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला राहुरी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. राहुरी तालुक्यातील ही सर्वात मोठी कारवाई असून या कारवाईमुळे अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क खात्याचे उपायुक्त प्रसाद सुर्वे, राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर अधीक्षक पराग नवलकर व उपाधीक्षक, अहमदनगर सी. पी. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने मांजरी शिवारातील हिंदुस्तान पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या हॉटेलवर छापा मारला असता विदेशी व देशी मद्याचे 74 बॉक्स आढळून आले. ही कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूरचे निरीक्षक अनिल पाटील, दुय्यम निरीक्षक, पी. बी. अहिरराव, के. यु. छत्रे, ए. सी. खाडे, नम्रता वाघ, राजेंद्र कदम, विकास कंठाळे, दीपक बर्डे, प्रवीण साळवे व महिला जवान वर्षा जाधव यांनी केली. पुढील तपास अनिल पाटील हे करीत आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!