Wednesday, April 24, 2024
Homeनगरराहुरीच्या पोलिसास हजाराची लाच घेताना पकडले

राहुरीच्या पोलिसास हजाराची लाच घेताना पकडले

राहुरी (प्रतिनिधी) – अजामीनपात्र वॉरंटची बजावणी न करता ते न्यायालयातून रद्द करून संबंधित कारवाई टाळण्याच्या मोबदल्यात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई भाऊसाहेब दौलत पवार यास एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

तक्रारदाराच्या विरूध्द न्यायालयातून अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते. या वॉरंटची बजावणी तक्रारदारावर न करता हे वॉरंट न्यायालयातून रद्द करून घेऊन ती कारवाई टाळण्यासाठी मदत केल्याच्या मोबदल्यात राहुरी पोलीस स्टेशनमधील पोलीस शिपाई भाऊसाहेब दौलत पवार (वय 27) याने लाचेची मागणी केली होती.

- Advertisement -

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती दिली होती. त्यानुसार काल सापळा रचण्यात आला होता. राहुरी कृषी बाजार समितीसमोरील भोलेप्रसाद हॉटेलमध्ये पवारने तक्रारदाराकडून 1 हजार रुपयांची लाच स्वीकारली असता त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर, पो. नि श्याम पवरे, पोहेकॉ. तनवीर शेख, पोना. प्रशांत जाधव, रमेश चौधरी, पोकॉ वैभव पांढरे, चालक हारूण शेख, अशोक रक्ताटे यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या