राहुरीत 56 हजार 997 गोण्या कांद्याची विक्रमी आवक

0

राहुरी (तालुका प्रतिनिधी) – येथील बाजार समितीत शुक्रवारी (दि.11) कांदा लिलाव झाला.

यावेळी एकूण 56 हजार 997 गोण्या कांद्याची विक्रमी आवक झाली.

मागील आठवड्याच्या तुलनेत आवक वाढली असून भावाची पातळीतही प्रतिक्विंटल 100 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. कांद्याच्या विविध प्रतवारीमध्ये चांगली वाढ झाली आहे.

गेल्या एक महिन्यापासून 1600 ते 1800 रुपये अशी वर्षभरातील सर्वोच्च भावाची पातळी गाठल्यानंतर आता कांद्याची मजल 3 हजार रुपये प्रतिक्विंटलकडे सुरू झाली आहे.

मागील आठवड्याच्या तुलनेत 10 हजार क्विंटल गोण्या कांद्याची आवक वाढूनही भावाची पातळीही पुन्हा 100 रुपयांनी वाढल्याने राहुरी बाजार समितीत कांदा आणणार्‍या शेतकर्‍यांची चांगलीच चांदी झाली आहे.

काल आवक वाढली. मागील आठवड्याच्या तुलनेत भावात स्थिरता आली आहे. चांगल्या दर्जाचा एक नंबरचा कांदा 2000 रुपयांपासून 2700 रुपयांपर्यंत विकला गेला. दोन नंबरचा कांदा 1201 रुपयांपासून ते 1975 रुपये विकला गेला. तीन नंबर 500 ते 1180 रुपयाने विकला गेला. कालच्या लिलावात गोल्टी कांद्यानेही विक्रम केला. 1322 रुपयापासून 2000 रुपयांपर्यंत गोल्टी कांदा विकला गेला. गोल्टी कांद्याच्या भावात वाढ झाल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

*