राहुरीत राष्ट्रवादीने घातले नोटाबंदीचे श्राद्ध

0
राहुरी स्टेशन (वार्ताहर) – नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य नागरिक यांचे जनजीवन विस्कळीत बनले असल्याने हा निर्णय देशाला मारक ठरला असल्याची टीका जि. प. व राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य शिवाजीराजे गाडे यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 व 1000 रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय घेतला त्यास काल एक वर्ष पूर्ण झाले. या निर्णयामुळे अनेक व्यवसाय अडचणीत आल्याने त्याचा फटका सर्व सामान्यापासून तर मोठमोठे व्यावसायिक शेतकर्‍यांना बसला आहे. त्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी राहुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार कार्यालय येथे तालुकाध्यक्ष अमृत धुमाळ,
जि.प. सदस्य शिवाजीराजे गाडे, नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, प्रांतिक सदस्य अजित कदम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, किशोर जाधव, पंचायत समिती सभापती मनीषा ओहळ, उपसभापती रवींद्र आढाव, युवक तालुकाध्यक्ष विजय कातोरे, राष्ट्रवादीचे देवळाली शहर उपाध्यक्ष केदारनाथ चव्हाण, विद्यार्थी अध्यक्ष जयंत सुपेकर, युवक अध्यक्ष युवराज पवार, संजय पोटे, सुरेश निमसे, आदींच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी गाडे बोलत होते.
केंद्र सरकारने नोटाबंदी करण्याचा फसवा निर्णय घेतला. त्याचा परिणाम गोरगरीब जनता, शेतकरी, मध्यमवर्गीय, व्यापारी या सर्वांना भोगावा लागला. यांच्या निषेधार्थ नोटाबंदीचे वर्षश्राद्ध घालून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसीलदारांच्या दालनात निदर्शने करण्यात आली. आंदोलनात मुळा-प्रवरा वीज संस्थेचे संचालक शिवाजी सागर, विश्‍वास पवार, भाऊसाहेब कोहकडे, दिलीप जठार, बाळासाहेब उंडे, अशोक कदम, योगेश सिनारे, डॉ. नरेंद्र इंगळे, जितेंद्र इंगळे, योगेश गाडे, परशराम अडसुरे, किशोर कोहकडे, राहुरी शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*