दिव्यांगाच्या गृहप्रवेश सोहळ्याला उपस्थित राहण्याचा योग भाग्यवंतालाच

0
आ. बच्चू कडू : राहुरी नगरपालिकेच्यावतीने दिव्यांगाला घरकुल प्रदान सोहळा
राहुरी (तालुका प्रतिनिधी) – आजपर्यंत आमदार, खासदार धनिकांचे अनेक गृहप्रवेश सोहळे झाले. मात्र, प्राजक्त तनपुरेच्या स्वप्नातून आज राहुरीतील अपंग, निराधार, मासरे कुटुंबीयांच्या गृहप्रवेश सोहळ्याला उपस्थित राहण्याचा योग खरोखर भाग्यवान माणसाच्या वाट्याला येतो. तो आज राहुरीकरांमुळे आला, याचा विशेष आनंद वाटतो. असे भावपूर्ण उद्गार प्रहार अपंग संघटनेचे संस्थापक अचलपूरचे आमदार बच्चूभाऊ कडू यांनी काढले.
राहुरी येथे नगरपरिषदेच्या अपंग 3 टक्के निधीवाटप तसेच प्राजक्त्त तनपुरेंच्या पुढाकारातून साकारलेल्या राहुरीच्या दिव्यांग मासरे कुटुंबियांच्या गृहप्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी संचालक पंढरीनाथ पवार होते.

प्रहारचे नाते एखाद्याबरोबर वेदनेबरोबर जुळते. भांडणे लावून स्वतः नेते घरात राहून कार्यकर्त्यांच्या रक्ताची होळी होताना आपण पाहिले आहे. मात्र, आज समाज बदलतो आहे. लोक प्रतिनिधी होण्यासाठी जातीधर्माची, पक्षाची गरज नाही. तर वंचितांच्या व्यथा थांबविण्यासाठी प्रयत्न करा, लोक तुमच्या पाठिशी येतील. प्राजक्त तनपुरेंचे काम खरोखर प्रशंसनीय असून अशा लोकनेत्याची सभागृहाला गरज असल्याने काम चालू ठेवा, जनता डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. यासाठी पक्षविरहित आमचे पाठबळ तुमच्या पाठिशी सदैव राहिल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

कामे होत नसतील तर एकवेळा नाही तर हजारवेळा सरकारी कामात अडथळा आणण्याचे गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही. तर वाकडे चालणार्‍यांना सरळ करण्याचे काम नक्कीच केले जाईल, असे त्यांनी ठणकावून सांगीतले. नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी हा सोहळा अविस्मरणीय असून आपले राजकारणातील आदर्शच या वंचित, दिव्यांग, दिनदलितांसाठी काम करणारे वेदनेवर फुंकर घालणारे आ. बच्चू कडूच असून राजकारणाच्या बदललेल्या गुंडगिरी, पैसा, जातीधर्माच्या व्याख्येला छेद देण्याचे काम करीत असलेले आ. कडू आमचे प्रेरणास्थान असल्याचे सांगितले. यावेळी उपसभापती रवींद्र आढाव, नवाज देशमुख, आदींसह प्रहार संघटनेच्या कार्यकत्यार्ंनी आपले विचार व्यक्त केले. व्यासपीठावर सभापती मनीषा ओहळ, रवी मोरे, गजानन सातभाई, नंदकुमार तनपुरे, मुख्याधिकारी नानासाहेब महानवार, शिवाजीराव डौले, दत्तात्रय शेळके, अशोक आहेर, विलास तनपुरे, बाळासाहेब उंडे, संजय साळवे, सूर्यकांत भुजाडी, भारतीताई पाटील, आदिनाथ तनपुरे, सुभाष आढाव, धीरज पानसंबळ, आदींसह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे यांनी तर आभार प्रकाश भुजाडी यांनी केले.

बारागाव नांदूर येथील जनतेवर मोठा अन्याय होत असताना याबाबत लोकप्रतिनिधींकडे व्यथा मांडण्यासाठी भेटण्याची गरज असताना त्यांना नेमके कोठे भेटावे? असा उपरोधिक सवाल नवाज देशमुख यांनी आपल्या भाषणातून के ला.

LEAVE A REPLY

*