राहुरीत गुरुमाउली अण्णासाहेब मोरेंचा राष्ट्रीय सत्संग महामेळावा

0

15 ऑगस्टला 3 वाजता आयोजन, अमृततुल्य हितगुजाचा कार्यक्रम, 17 वर्षांनंतर गुरुमाउलींच्या सत्संगाचा योग, महामेळाव्याची जय्यत तयारी

देवळाली प्रवरा (वार्ताहर) – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्‍वर प्रमुख गुरुमाउली प. पू. अण्णासाहेब मोरे यांचा राष्ट्रीय सत्संग महामेळावा राहुरी येथील कोरडेमळा, कॉलेजरोड येथे येत्या 15 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सतीशराव इंगळे व बाबाजी धनवडे यांनी दिली आहे.
श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने गुरुमाउली प पू. अण्णासाहेब मोरे यांचे धर्म, देश, प्रांत, सीमा यांच्या भेदाच्याही पलीकडे उद्बोधन करणारे, मानवी जीवनाचा सर्वांगीण, परिपूर्ण विकास करणार्‍या क्लृप्त्या सांगणारे, वास्तवातील ग्रामअभियानातून संस्कृती जपून राष्ट्रीय विकास वृद्धीस कसा लावावा? या सर्व विषयांवर आधारित ‘अमृततुल्य’ हितगुजाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी शेतीशास्त्र, आयुर्वेद, अध्यात्म, वास्तुशास्र, मानवाच्या विविध समस्या, गुरूप्रणाली अंतर्गत ग्रामअभियान, स्वयंरोजगार, शेतीसाठी आधुनिक तंत्र, शेतीचे वास्तुशास्र, पर्जन्य देवतांची उपासना या सर्व मानवी जीवनाला परिपूर्ण करणार्‍या बाबींवर प.पू. गुरुमाउलींचे प्रबोधनात्मक हितगुज करणार आहेत. प.पू. गुरुमाउलींच्या विचारांचे सिंचन आत्मसात करून भाविकांनी आपले जीवन उन्नत करून घ्यावे, असे आवाहन समस्त सवेकरी राहुरी तालुका यांनी केले आहेराहुरी तालुक्यात सतरा वर्षानंतर गुरूमाऊलींचा सत्संग मेळावा होत असल्याने जय्यत तयारी सुरू झाली आहे.
  • मेळाव्यासाठी येणार्‍या भाविकांसाठी भव्य मंडपाचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी सकाळी साडेदहाच्या आरतीनंतर दुर्गासप्तशती पाठ, स्वामीचरित्र पारायण व बाल संस्कार विभागाचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

LEAVE A REPLY

*