Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

खोट्या अ‍ॅट्रोसिटीच्या विरोधात राहुरीत मोर्चा

Share

गुन्हे मागे घेण्याची मागणी । खोटे गुन्हे सहन करणार नाही ः कदम

राहुरी (तालुका प्रतिनिधी)- गुन्हेगारी पोसणार्‍या प्रवृत्तींना प्रशासन पाठिशी घालत असल्यामुळे समाजात अशांतता पसरत आहे. सामान्य जनतेवर जर खोटे गुन्हे दाखल होत असतील तर ते सहन केले जाणार नाहीत. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्यावर आमचा विश्वास असल्याने हा पहिला व शेवटचा मोर्चा शांततेच्या मार्गाने आम्ही आणला आहे. याची दखल पोलीस प्रशासनाने घेऊन खर्‍या गुन्हेगारांवर कारवाई करावी. खोटे गुन्हे मागे घेऊन अवैध धंदे बंद करावेत, अन्यथा आमच्या मार्गाने प्रश्न हातात घेऊन ते सोडावे लागतील, असा इशारा नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी दिला.

राहुरी फॅक्टरी येथील हॉटेलमध्ये झालेल्या वादातून हॉटेल मालक प्रशांत व विशाल मुसमाडे या बंधूंच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटीचा खोटा गुन्हा दाखल झाल्याच्या निषेधार्थ व तो खोटा गुन्हा मागे घ्यावा, यासाठी राहुरी तालुका पोलीस ठाण्यावर मराठा व बहुजन समाजाच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता. काल (दि. 19) सकाळी कृषी उत्पन्न बाजार समिती येथून मोर्चाला सुरूवात केली. शहरातील पेठेतून पायी चालत जात पोलीस ठाण्यावर मोर्चा जाऊन धडकला. यावेळी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या लोकराज्यात चाललंय तरी काय? कायदा व सुव्यवस्थेचा बोर्‍या वाजला आहे. अशा भावना मोर्चेकर्‍यांनी व्यक्त केल्या. मुसमाडे बंधूंवर दाखल झालेला अ‍ॅट्रोसिटी गुन्हा मागे घ्यावा, नाहीतर मोर्चेकर्‍यांवर अ‍ॅट्रोसिटी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मोर्चेकर्‍यांच्यावतीने करण्यात आली.

नगराध्यक्ष कदम म्हणाले, देवळाली प्रवरा मधील नागरिकांनी याआधी पोलीस प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी कितीतरी वेळा आंदोलने करून आपल्या मागण्या मांडल्या आहेत. परंतु तरीदेखील धिम्म झालेल्या पोलीस प्रशासनाने याबाबत कुठलाही ठोस निर्णय घेतला नसून देवळाली शहरामध्ये सेच राहुरी तालुक्यामध्ये अनेक प्रकारचे अवैध धंदे व गुन्हेगारी वाढली असून त्यावर अंकुश आणणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाने येत्या आठ दिवसांमध्ये काही कारवाई केली नाही, तर आज मोर्चामध्ये सहभागी झालेले हजारो तरूण तसेच नागरिक उपस्थित आहेत. हे सर्व आठ दिवसानंतर स्वतः कायदा हातात घेऊन त्यांच्या परीने गुन्हेगारी व अवैध धंदे करणार्‍यांवर ती कारवाई करतील. हा मोर्चा कोणा एका समाजाच्या विरोधात नसून गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या सर्व समाजातील वृत्तीविरुद्ध आहे.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, सत्यवान पवार, देवळालीचे उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, संभाजी ब्रिगेडचे मच्छिंद्र गुंड, मराठा एकीकरण समितीचे सचिन ठुबे, मराठा महासंघाचे अनिल तनपुरे, नितीन पानसरे, अ.भा.छावा संघटनेचे देवेंद्र लांबे, अनिल आढाव आदींनी संतप्त प्रतिक्रिया देत पोलीस प्रशासनाच्या कारभारावर रोष व्यक्त केला.

मोर्चामध्ये नगरसेवक सचिन ढूस, बाळासाहेब खुरूद, शैलेंद्र कदम, दत्ता कवाणे, देवळाली प्रवरा शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील कराळे, बाळासाहेब खांदे, गणीभाई शेख, संजय बर्डे, ज्ञानेश्वर वाणी, आदिनाथ कराळे, तुषार शेटे, विजय गव्हाणे, दादासाहेब पवार, राजेंद्र उंडे, जयेश मुसमाडे, शिवाजी कपाळे, सूर्यकांत भुजाडी, नितीन कल्हापुरे, रमेश म्हसे, अशोक कदम, बाबासाहेब चव्हाण, भीमराज मुसमाडे, भारत शेटे, अमोल कदम, सचिन सरोदे, सुधाकर कदम, सागर खांदे, भागवत मुंगसे, बाबासाहेब मुसमाडे, वैभव पेरणे, विजय कातोरे, प्रल्हाद पेरणे, राष्ट्रीय छावा संघटनेचे सतीश सौदागर, शहाजी कदम, रवी मोरे, संदीप तांबे, संदीप गाडे, अजित चव्हाण, डॉ. संदीप मुसमाडे, अ‍ॅड. प्रशांत मुसमाडे, तुषार भुजाडी, कांता तनपुरे, शरद तनपुरे, नवनाथ सप्रे, राजेंद्र लबडे, अजीज इनामदार, योगेश देशमुख, बाबासाहेब शेटे, सतीश घुले, विक्रम गाढे, वैभव गाडे, विनायक बाठे, अनिल इंगळे, पिनूशेठ कटारे, सुभाष पवार, ज्ञानेश्वर टेकाळे, अविनाश पवार, दिनेश झावरे, राजेंद्र खोजे, शरद म्हसे, अमोल वाळुंज, सतीश वाळुंज, राजेंद्र भोरे, सुरेश तोडमल, अमोल मोढे, सचिन धसाळ, दीपक डावखर, रावसाहेब मांगुर्डे, रणजित चव्हाण, दीपक डौले, प्रवीण देशमुख आदींसह नागरिक उपस्थित होते. आभार व्यापारी असोसिएशनचे विष्णू गीते यांनी मानले.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!