राहुरीतील अपघातात प्राध्यापक अरविंद शेटे ठार

0
राहुरी स्टेशन (वार्ताहर) – उसाने भरलेली ट्रॉली घेऊन कारखान्याकडे निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागील चाकाखाली सापडून अरविंद मोहन शेटे (रा. शिलेगाव, ता. राहुरी) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना काल सोमवारी (दि. 04) दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास राहुरी स्टेशन रोडवरील दत्तनगरजवळ घडली. या घटनेमुळे शिलेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अरविंद ऊर्फ बाळासाहेब मोहन शेटे (वय35) हे दुचाकी क्रमांक एमएच 17 यू 6311 वरून राहुरीहून शिलेगावकडे आपल्या घरी जात होते. त्याचवेळी स्टेशनकडून राहुरीमार्गे कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेला ट्रॅक्टर व ट्रॉली क्रमांक एमएच 17 एव्ही 8090 हा स्टेशनरोडवरील दत्तनगर येथून साधारण दोन वाजेच्या सुमारास जात असतानाच अरविंद शेटे यांचा ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली सापडून चाक पोटावरून गेल्याने झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला.
शेटे हे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीछत्रपती शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक विभागात प्राध्यापक म्हणून गेल्या सात वर्षांपासून कार्यरत होते. अपघातानंतर रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली. त्यातच या रस्त्यावर लग्नसराईची मोठी वर्दळ होती.
राहुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, चालक पोलीस उत्तरेश्‍वर मोराळे हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मदतकार्यास सुरूवात केली. वाहतूक सुरळीत करण्यास व रस्त्यावरील अपघातग्रस्त उसाने भरलेला ट्रॅक्टर व ट्रॉली काढण्यास स्थानिक रहिवाशी संदीप सोनवणे, मेजर आदिनाथ तनपुरे, वसीम सय्यद, राजेश देशमुख, अनिल चव्हाण, अविनाश फुलसौंदर, सुनील पोपळघट आदींनी मदतकार्य करत वाहतूक सुरळीत केली.

LEAVE A REPLY

*