Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

राहुरीत दोन लाख 20 हजार रुपये जप्त

Share

भरारी पथकाची कामगिरी

राहुरी (प्रतिनिधी) – राहुरी मतदारसंघात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना काल सकाळी टाकळीमिया-राहुरी रस्त्यावर वाघाचा आखाडा शिवारात दोन लाख 20 हजारांची रोकड एसएसटीच्या पथकाने पकडली. टाकळीमियाहून चारचाकी वाहनातून ही रोकड राहुरीच्या दिशेने नेण्यात येत होती. दरम्यान, ही रोकड कोणाची याबाबत माहिती मिळू शकली नाही.

राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी ही रोकड पंचनाम्यानंतर नगर येथील शासकीय कोषागारात जमा केली आहे. सध्या निवडणुकीची रणधुमाळी चालू असल्याने राहुरी मतदारसंघात आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी शासकीय यंत्रणेकडून सुरू आहे. ठिकठिकाणी शासकीय व पोलीस पथकांचा दुचाकी व चारचाकी वाहनांवर वॉच आहे. काल वाहन क्रमांक एमएच 12 एनबी 5243 हे चारचाकी टाटा झेस्ट वाहन सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास चालले असताना एसएसटी पथकाचे प्रमुख डी.जी. दळे यांना वाहनाची तपासणी करताना त्यात दोन लाख 20 हजार रुपयांची रोकड आढळून आली. दरम्यान पथकाने रोकड ताब्यात घेतली असून ती नगर येथे शासकीय कोषागारात जमा करण्यात आली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!