Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या हिट-चाट

राहुल महाजनचं तिसरं लग्न

Share
मुंबई : दिवंगत नेते प्रमोद महाजन, यांचा मुलगा राहुल महाजन पुन्हा एकदा बोहल्यावर चढला आहे. राहुलनं २५ वर्षीय कझाकिस्तानी प्रेयसी नात्याला लिनासोबत लग्नगाठ बांधली आहे. नुकताच मलबार हिल परिसरात या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी काही मोजकेच लोक उपस्थित होते.

राहुल महाजनचं हे तिसरं लग्न आहे. याआधी राहुल महाजननं वैमानिक श्वेता सिंग सोबत लग्न केलं होतं. मात्र हे लग्न फार काळ टिकलं नाही. त्यानंतर ‘राहुल दुल्हनियाँ ले जायेंगे’ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून राहुलनं डिंपी गांगुलीशी लग्न केलं. लग्नानंतर केवळ चार महिन्यांतच राहुलने मारहाण केल्याची तक्रार डिंपीने केली होती. लग्नानंतर पाच वर्षांत दोघांचा घटस्फोट झाला. राहुलपासून विभक्त झाल्यानंतर डिंपीनं दुबईस्थित उद्योजक रोहित रॉय याच्याशी विवाह केला.

राहुलनं कझाकिस्तानी मॉडेलशी लग्न केलं आहे. ‘मी आधीची दोन लग्न धुमधडाक्यात केली पण ती जास्त काळ टिकली नाहीत. मी साधारण वर्षभरापासून नताल्याला ओळखतो. आमच्या दोघांमध्ये चांगली समज आहे. तिला एका नव्या व्यवसायाला सुरूवात करायची आहे आणि मी तिला यामध्ये मदत करेन’ असं राहुलने म्हटलंय.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!