Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच धुळे मुख्य बातम्या राजकीय

राहुल गांधी आज धुळ्यात

Share
धुळे । भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व खा. राहूल गांधी यांची सभा उद्या दि. 1 मार्च रोजी दुपारी 2 वाजता शहरातील देवपूर परिसरातील एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. पोलिस प्रशासनाने राहूल गांधींच्या दौर्‍यामुळे बंदोबस्तासह पार्किंग व्यवस्थेचे नियोजन केले आहे.

सभास्थळी आवश्यक ती सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. सभास्थळातील श्वान पथकामार्फत कसून तपासणी केली जात आहे. सभास्थळाचा ताबा धुळे पोलिस दलाने घेतला आहे. पोलिस अधिक्षक विश्वास पांढरे यांनी सभास्थळाच्या सुरक्षेतेचा आढावा घेतला.

पार्किंग व्यवस्थेचे नियोजन- खा. राहूल गांधी यांच्या दौर्‍यामुळे पार्किंग व्यवस्थेचे नियोजन पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे. साक्री, पिंपळनेरकडून येणारी वाहने साक्री रोडवरील संतोषी माता चौक, सावरकर पुतळा, नदी किनारचा नवीन रस्ता मार्ग, पॉलिटेक्निक कॉलेजच्या मैदानावर वाहने लावावीत.

चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, जळगावकडून येणारे वाहने बायपास रोडने बिलाडी फाटा मार्गाने येवून पॉलिटेक्निक कॉलेजच्या मैदानावर वाहने पार्किंग करावीत, शिरपूर, दोंडाईचा, नरडाणा येथून येणारे वाहने बायपास उड्डाण पुलावरुन बिलाडी फाट्याकडून पॉलिटेक्निक कॉलेजच्या मैदानावर वाहने पार्किंग करावीत. असे आवाहन पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.

या सभेला खान्देशातून लाखो नागरीकांनी उपस्थित राहवे असे आवाहन माजी मंत्री रोहिदास पाटील, आ. अमरिशभाई पटेल, आ. कुणाल पाटील आदींनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!