Type to search

‘चौकीदार चोर है’ प्रकरणी राहुल गांधींकडून सुप्रीम कोर्टाची बिनशर्त माफी

Featured आवर्जून वाचाच देश विदेश

‘चौकीदार चोर है’ प्रकरणी राहुल गांधींकडून सुप्रीम कोर्टाची बिनशर्त माफी

Share

नवी दिल्ली – ‘चौकीदार चोर है’ या घोषणेप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल चुकीच्या पद्धतीने सांगितल्याप्रकरणी कोर्टाने खडसावल्यानंतर राहुल गांधी यांनी आज कोर्टाची बिनशर्त माफी मागितली. त्यामुळे आता या वादावर पडदा पडला आहे. पक्षाची राजकीय घोषणा चुकून कोर्टाच्या आदेशासोबत जोडली, असे स्पष्टीकरण कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात राहुल गांधी यांनी दिलं आहे.

त्यांनी सुप्रीम कोर्टात तीन पानाचं प्रतिज्ञापत्र दाखल करुन बिनशर्त माफी मागितली आहे. माझी माफी स्वीकारुन प्रकरण मिटवावं, अशी विनंती राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्रात केली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान, काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना चौकीदार चोर है अशी घोषणा दिली होती. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने राफेलप्रकरणी यापूर्वी केंद्र सरकारला फटकारले होते. मात्र, कोर्टाच्या या निकालाचा दाखला देताना राहुल गांधी यांनी कोर्टानेही चौकीदार चोर असल्याचे मान्य केल्याचे म्हटले होते.

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर भाजपाने आक्षेप घेतला होता. तसेच राहुल यांच्याविरोधात कोर्टात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना निकाल चुकीच्या पद्धतीने सांगितल्याप्रकरणी तंबी दिली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी आपण निवडणुकांच्या प्रचाराच्या गोंधळात हे वक्तव्य केले असल्याचे सांगत दोन वेळा चुकीबाबत केवळ खेद व्यक्त केला होता. मात्र, आज राहुल गांधींच्या वकिलांनी त्यांच्यावतीने बिनिशर्त माफी मागितली.

राफेलप्रकरणी उद्या सुनावणी – दरम्यान, राफेलप्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे. तत्पूर्वी घडलेली ही घडामोड महत्वाची मानली जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!