Type to search

Featured देश विदेश मुख्य बातम्या

मोदींविरोधात बोलल्यास गजाआड करण्याचे धोरण – राहुल गांधी

Share
आरएसएसच्या हातात आसाम जाऊ देणार नाही - राहुल गांधी, Rahul Gandhi Statement

वायनाड – नरेंद्र मोदी किंवा त्यांच्या सरकारविरोधात कुणी शब्द जरी काढला तरी त्याला गजाआड करण्यात येईल, असेच देशातील सध्याचे चित्र असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. देशातील मॉब लिंचिंग घटनांविरोधात आवाज उठवणार्‍या तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याबाबत पत्र पाठवणार्‍या बॉलिवूडसह अन्य इंडस्ट्रीजमधील जवळपास 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरून राहुल गांधींनी सरकारवर टीका केली. तेे त्यांच्या केरळ येथील वायनाड मतदारसंघात एका कार्यक्रमात बोलत होते.

ते म्हणाले, देश आता एकाधिकारशाहीकडे वाटचाल करीत असून यात कुठेलही गुपित राहिलेले नाही. देशात काय चालले आहे हे लोकांना कळते आहे. जो कुणी पंतप्रधानांविरोधात काही बोलेल, सरकारविरोधात काही सांगेल त्याला तुरूंगात टाकले जाईल, त्याच्यावर हल्ले केले जातील. माध्यमांना तर चिरडून टाकण्यात आले आहे. देशात काय चालले आहे ते सगळ्यांना कळते आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!