राहुल गांधी उद्या संगमनेरात

0

कांबळे व भुजबळ यांच्यासाठी संयुक्त प्रचारसभा

संगमनेर (प्रतिनिधी) –  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची उद्या शुक्रवारी संगमनेरात जाहीर प्रचार सभा होणार आहे. शिर्डी लोकसभेचे काँग्रेस उमेदवार भाऊसाहेब कांबळे व नाशिक लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ आयोजित ही संयुक्त प्रचारसभा संगमनेरातील जाणता राजा मैदानावर सायंकाळी 5 वाजता होणार आहे, अशी माहिती माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी दिली.

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर ते प्रथमच जाहीरसभेच्या निमित्ताने नगर जिल्ह्यात येत आहे. त्यामुळे या सभेला विशेष महत्व आहे.

या सभेच्या वेळी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण, माजी मंत्री आ. छगनराव भुजबळ, विरोधीपक्षनेते आ. धनंजय मुंडे, आ. डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, आ. भाऊसाहेब कांबळे, समीर भुजबळ, यांसह राज्यातील प्रमुख नेते व नगर नाशिक जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार, आजी-माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सभेची जय्यत तयारी – संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या सभेची तयारी सुरु असून पोलीस अधिक्षक ईशू सिंधू यांनी वरीष्ठ अधिकार्‍यांसह जाणता राजा मैदानाची पाहणी करुन आढावा घेतला.

अध्यक्ष झाल्यानंतर गांधी प्रथमच जिल्ह्यात – राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच नगर जिल्ह्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षात उत्साह संचारला आहे. मोदी आणि शाह यांच्या लोकशाही विरोधी कारभाराविरोधात देशपातळीवर राहुल गांधी यांनी केलेला संघर्ष जनता बघते आहे, त्यामुळे त्यांच्या सभेबाबत मोठा उत्साह दिसून येतोय.

LEAVE A REPLY

*