इंधनदरवाढीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का?; राहुल गांधी

0
नवी दिल्ली : केंद्रात ‘यूपीए’चे सरकार असताना पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवरून आक्रमकपणे बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता मौन का धारण केले आहे?. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने नव्वदी गाठली आहे, तरीही पंतप्रधान बोलत नाहीत, ते गप्प का आहेत?, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसने आज भारत बंद पुकारला असून धरणे आंदोलनात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले कि, आज इतर विरोधी पक्षही आमच्यासोबत देशव्यापी संपात आमच्यासोबत सहभागी झाले आहेत ही समाधानाची बाब आहे. आपण सगळे एकत्र येऊन नरेंद्र मोदींना हटवू शकतो असाही नारा यावेळी राहुल यांनी दिला. यावेळी नोटाबंदीच्या निर्णयावरही राहुल यांनी टीका केली. नोटाबंदीचा निर्णय हा मोजक्या व्यापाऱ्यांच्या हितासाठी झाला. काळा पैसा बाहेर येणार होता त्याचे काय झाले? भ्रष्टाचार कमी झाला का? असेही प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले. इतकेच नाही तर जीएसटीवरही त्यांनी टीका केली.जीएसटीच्या अंमलबजावणीत केंद्र सरकारने एवढी घाई का केली? असाही प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला.

इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने रामलीला मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या धरणे आंदोलनात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, शरद यादव, आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांच्यासह विविध पक्षांचे नेते सहभागी झाले आहेत. यावेळी शरद पवार यांनीही केंद्र सरकारवर टीका केली.

LEAVE A REPLY

*