Type to search

Featured maharashtra देश विदेश मुख्य बातम्या

राहुल गांधीची वर्ध्यातून 2 ऑक्टोबरला पदयात्रा

Share

नवी दिल्ली – राज्यात एकीकडे शरद पवार निवडणूक प्रचाराला लागलेले असताना काँग्रेसच्या गोटात मात्र शांतता पाहायला मिळतेे. त्यामुळे आता निवडणूक प्रचारासाठी खुद्द काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीच मैदानात उतरणार असल्याचे समजते आहे. 2 ऑक्टोबरला वर्ध्यातील गांधी आश्रमातून ते पदयात्रेला सुरुवात करण्याची शक्यता आहे.

महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमीत्त काँग्रेस नेत्यांच्या संपुर्ण देशभर पदयात्रा निघणार आहे. या निमित्ताने राहुल गांधी हे अज्ञातवासातून अखेर बाहेर येणार असून 2 ऑक्टोबरला पदयात्रेला सुरुवात करण्याची शक्यता आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाच्या 18 दिवस आधी राहुल गांधी महाराष्ट्रात दिसणार आहेत. राहुल गांधी पदयात्रा काढत काँग्रेसच्या प्रचारासाठी नारळ फोडणार असल्याची देखील चर्चा आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!