राहुल गांधींनी भरला उमेदवारी अर्ज

0

काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी राहुल गांधी यांनी आज (सोमवारी) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

विद्यमान अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे प्रस्तावक आहेत. निवडणुकीत राहुल गांधी एकमेव उमेदवार असतील आणि त्यांची बिनविरोध निवड होईल असे समजले जात आहे.

सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून रविवारपर्यंत इतर कोणाचाही अर्ज दाखल झालेला नव्हता.

 

LEAVE A REPLY

*