Type to search

देश विदेश मुख्य बातम्या

राहुल गांधींविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य; सुब्रमण्यम स्वामींविरोधात 39 एफआयआर दाखल

Share

जयपूर – काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणे भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांना चांगलेच भोवण्याची शक्यता आहे. वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी स्वामी यांच्याविरोधात राजस्थानात 20 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकेनंतर यूथ काँग्रेसकडून विविध पोलीस स्टेशनमध्ये 39 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राहुल गांधी हे अंमलीपदार्थाचे सेवन करतात असे वादग्रस्त विधान सुब्रमण्यम स्वामी यांनी केले होते. या विधानांवर तीव्र नाराजी व्यक्त करीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वामी यांच्याविरोधात कलम 504 (जाणीवपूर्वक शांतता भंग करणे), कलम 505 (सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे) आणि कलम 511 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी या वक्तव्याप्रकरणी जाहीररित्या माफी मागावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. स्वामी यांच्याकडून राहूल गांधींविरोधात जाणीवपूर्वक टिप्पणी केल्याने कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत, असे याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेसला बदनाम करण्यासाठी आणि राजकीय लाभ मिळवण्यासाठी 5 जुलै रोजी जाणीवपूर्वक राहुल गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले. याप्रकरणी स्वामी यांनी सार्वजनिकरित्या माफी मागायला हवी, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!