…… तर राहुल गांधींचं विमान कोसळलं असतं

0
नवी दिल्ली: कर्नाटक विधानसभा निवडणुकीवेळी प्रचारासाठी जाताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. त्यावेळी वैमानिकानं परिस्थिती नियंत्रणात आणली नसती, तर अवघ्या काही सेकंदात राहुल गांधींचंविमान कोसळलं असतं, अशी माहिती नागरी उड्डाण संचलनालयाच्या (डीजीसीए) अहवालातून समोर आली आहे. त्यावेळी राहुल गांधींच्या विमानानं इमर्जन्सी लँडिंग केलं होतं. त्यावेळी वैमानिकानं प्रसंगावधान राखलं नसतं, तर मोठा अनर्थ घडला असता.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे २६ एप्रिल रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिल्लीतून हुबळी येथे जाण्यासाठी निघाले. विमानात राहुल गांधींसह अन्य काही जण होते. या विमानात बिघाड झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणी काँग्रेसने नागरी हवाई वाहतूक महासंचालनायकडेही (डीजीसीए) तक्रार केली होती. डीजीसीएने या घटनेची सविस्तर चौकशी केली असून चौकशीतून उघड झालेली माहिती धक्कादायक आहे.

राहुल गांधींच्या विमानात झालेला बिघाड ही तांत्रिक समस्या नसून तो मोठा कट असल्याची टीका त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी केली होती. राहुल यांच्या निकटवर्तीयांनी या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडेही केली होती. यानंतर हवाई उड्डाण क्षेत्रातील नियंत्रक संस्था असलेल्या नागरी उड्डाण संचलनालयानं (डीजीसीए) यासाठी दोन सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीनं आपला अहवाल डीजीसीएला दिला. ‘कदाचित वैमानिकाच्या चुकीमुळे तसं घडलं असेल. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं ते एका बाजूला झुकलं आणि जमिनीवर कोसळण्याच्या स्थितीत होतं. त्यामुळे विमानातून आवाज येऊ लागला.

या प्रकरणात डीजीसीएकडून विमानातील डेटा रेकॉर्ड आणि कॉकपिट सिस्टिमची तपासणी करण्यात आली,’ अशी माहिती डीजीसीएच्या एका अधिकाऱ्यानं दिली. अहवाल ‘गोपनीय’ असल्याचे सांगत सार्वजनिक करण्यात आलेला नाही. मानवी चुकांमुळेच हा बिघाड झाल्याचे या अहवालात म्हटल्याचे समजते. हा अहवाल सरकारने सार्वजनिक करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

LEAVE A REPLY

*