Saturday, April 27, 2024
Homeनगरराहाता : 25 ग्रामपंचायतीच्या 301 जागांसाठी 1208 उमेदवारी अर्ज दाखल

राहाता : 25 ग्रामपंचायतीच्या 301 जागांसाठी 1208 उमेदवारी अर्ज दाखल

राहाता (तालुका प्रतिनिधी) –

राहाता तालुक्यातील निवडणूक होत असलेल्या 25 ग्रामपंचायतींसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर

- Advertisement -

301 जागांसाठी 1208 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारी तालुका प्रशासकीय कार्यालयाचे इमारतीत इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. उमेदवारी अर्जाची छाननी होऊन अर्ज माघारीची प्रकिया पुर्ण झाल्यानंतरच ग्रामपंचायतीच्या निवडणूक रिंगणात किती उमेदवार उरले आहेत याचे चित्र स्पष्ट होईल. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या पैकी काहींची मनधरणी करण्यामध्ये गाव पातळीवरील नेते व पुढारी यशस्वी झाल्यास ते मनधरणी समाधान झालेले उमेदवार निवडणूक रिंगणातून माघार येऊ शकतील. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर ग्रामपंचायत गाव निहाय दाखल झालेले उमेदवारी अर्ज पुढील प्रमाणे आहेत.

चंद्रापूर (33), हसनापूर (58), आडगाव बुद्रुक (34), जळगाव (38), रामपूरवाडी (23), रांजणगाव खुर्द (40), लोणी बुद्रुक (54), शिंगवे (34), केलवड (57), पिंपळवाडी (30), पिंपरी लोकाई (22), वाळकी (25), सावळीविहीर खुर्द (26), बाभळेश्वर (53), भगवतीपूर (98), कोल्हार बुद्रुक (117), लोणी खुर्द (115), ममदापूर (46), गोगलगांव (49), हनुमंतगांव (35), नांदूर (41), पाथरे बुद्रुक (36), तिसगांव (30), अस्तगाव (81), एकरूखे (33) या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कोल्हार बुद्रुक या ग्रामपंचायतीसाठी सर्वाधिक 117 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर त्याखालोखाल लोणी खुर्द करिता 115 व भगवतीपूरसाठी 98 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर सर्वात कमी अर्ज पिंपरी लोकाई या ग्रामपंचायतीसाठी दाखल झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या