Type to search

Featured सार्वमत

राहाता पालिका कंत्राटी कर्मचारी व स्वच्छता ठेकेदारामध्ये राडा

Share

परस्परविरोधी तक्रारी दाखल

राहाता (तालुका प्रतिनिधी) – राहाता नगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कर्मचारी व ठेकेदार यांच्यात राडा झाला असून याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहे. कर्मचार्‍यांना मनमानी वागणूक देऊन कामावरून काढून टाकण्याची ठेकेदार धमकी देत असल्याची कर्मचारी संघटनेची तक्रार तालुका अध्यक्ष मोकळ यांनी केली आहे. राहाता नगरपालिका स्वच्छतेचा ठेका पुण्याच्या खाजगी कंपनीकडे आहे. पूर्वी पालिकेकडे कंत्राटी बेसवर काम करणारे कर्मचारी या ठेकेदाराकडे काम करत असून त्यांना वेळेवर पगार मिळत नाही, सुविधा मिळत नाहीत, तसेच मनमानी पध्दतीने काम करून घेतले जाते. नियमाप्रमाणे किमान वेतन दिले जात नाही. महिन्याच्या सुट्या न देता 30 दिवस कर्मचार्‍यांकडून काम करून घेतले जाते. पालिका व ठेकेदार यांच्या वादात अडकलेला दोन महिन्यांचा पगार दिला जात नाही.

तो मागितला तर काम करायचे तर करा नाहीतर कामावर येऊ नका, अशा धमक्या ठेकेदाराकडून दिल्या जात आहेत. साप्ताहिक सुटी व सफाई कामगारांना साहित्य दिले जात नाही. कर्मचार्‍यांना ड्रेस देणे ठेकेदार व पालिकेची जबाबदारी असताना दिलेल्या एका ड्रेसचे पैसेही कर्मचार्‍यांच्या पगारातून वसूल केले गेले. मनमानी पध्दतीने कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले जाते. कर्मचार्‍यांना सुविधा द्या व पगार वेळेवर करा या मागणीसाठी काल पालिकेचे कायमस्वरूपी कर्मचारी हे संबंधित ठेकेदाराकडे गेला असता त्याला दमबाजी व हुसकावून लावल्यावरून त्याच्याविरूध्द पोलीस ठाण्यात कंपनीच्यावतीने तक्रार करून गुन्हा दाखल केला, असा आरोप सर्व कर्मचार्‍यांच्यावतीने केला. आमच्या न्याय मागण्या केल्यावर कंपनीकडून मुस्कटदाबी होत असून 25 तारखेला कामगारांच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी यांच्यासमोर कामगार प्रश्नी बैठक लावल्याने सूड भावनेने कंपनीकडून कर्मचार्‍यांवर दहशत केली जात असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.
तर कंपनीच्यावतीने पोलीस ठाण्यात संतोष टाक या कर्मचार्‍याविरोधात तक्रार दिली की, दारू पिऊन शिवीगाळ केली. दोन्ही बाजूंच्या तक्रारी पोलिसांनी दाखल करून घेतल्या आहेत.

खाजगी ठेकेदाराने पदाधिकारी व अधिकार्‍यांना कल्पना न देता गरीब कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करणे म्हणजे ही मनमानी असल्याचा आरोप करत पोलिसांनीही शहानिशा न करता पालिका प्रशासनाला न विचारता गुन्हा दाखल करणे योग्य नाही. कर्मचार्‍यांच्या रास्त मागण्या पूर्ण करणे कंपनीचे कर्तव्य असून करारात दिलेल्या अटी, शर्तीप्रमाणे कंपनी काम करत नाही. कर्मचार्‍यांचे पगार वेळेवर होत नाहीत. साहित्य दिले जात नाही. सुट्या दिल्या जात नाहीत. रखडलेल्या दोन महिन्यांच्या पगाराबाबत कोणी काही बोलत नाही. कंपनीने केलेल्या कराराप्रमाणे काम करत नाही. कचर्‍याचे वर्गीकरण केले जात नाही. गटारींची सफाई रामभरोसे आहे. कराराचे पालन न करणार्‍या कंपनीचा ठेका रद्द करून पालिकेने गुन्हा दाखल करण्याची गरज असताना प्रशासन व पदाधिकारी डोळेझाक करतात. गरीब कर्मचार्‍यांवर अन्याय केला जात असताना पदाधिकारी व मुख्याधिकारी गप्प का? संबंधित ठेकेदाराला कुणाचा आशीर्वाद आहे तो कुणालाही न विचारता कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करतो याचा जाब मुख्याधिकारी यांना विचारला जाईल, असा इशारा पालिका विरोधी पक्ष गटनेता अ‍ॅड. विजय सदाफळ यांनी दिला.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!