राहाता : 85 टक्के मतदान

0
राहाता (तालुका प्रतिनिधी) – राहाता तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींसाठी सरासरी 85 टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया किरकोळ कुरबुरी वगळता शांततेत पार पडले. नांदुर्खी बु मध्ये किरकोळ बाचाबाची तर साकुरीत गोदावरी वसाहतीवरील केंद्रात मशीन काही वेळ बंद पडले. 11 सरपंच व 132 सदस्यांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद झाले.
राहाता तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींपैकी लोहगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने आज 11 ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले. यामधे राजूरी ग्रामपंचायत मध्ये 94 टक्के मतदान झाले, न पा वाडी ग्रामपंचायत मध्ये 94 टक्के मतदान झाले, रांजणखोल ग्रामपंचायत मध्ये 83.83 टक्के मतदान झाले, आडगांव खु ग्रामपंचायत मध्ये 88.12 टक्के मतदान झाले,
डोर्‍हाळे ग्रामपंचायतमध्ये 91. 74 टक्के मतदान निघोज ग्रामपंचायत मध्ये 87.14 टक्के मतदान झाले, सावळविहीर ग्रामपंचायत मध्येे 82. 53 टक्के मतदान झाले, साकुरी ग्रामपंचायत मध्ये 79.61 टक्के मतदान झाले, नांदुर्खी बु मध्ये 93.39 टक्के मतदान झाले,
खडकेवाके ग्रामपंचायतमध्ये 90.41 टक्के मतदान झाले. तर नांदुर्खी खुर्द मध्ये97.31 टक्के मतदान झाले. सर्व 11 ग्रामपंचायतीमधे सरासरी 85 टक्के मतदान झाले. शुक्रवारी संध्याकाळी न पा वाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवरून दोन गटात बाचाबाची झाली.
अधिक पोलीस बंदोबस्त नेमल्याने तेथील निवडणूक शांततेत पार पडली तर साकुरी ग्रामपंचायत निवडणूक गोदावरी वसाहत बुथ वरील मशीन बंद पडले तात्काळ तेथे दुसरे मशीन लावन्यात आले. सकाळ पासून सर्वच मतदान केंद्रावर गर्दी दिसून येत होती. सर्वत्र शांततेत मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी माणिकराव आहेर यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

*