राहाता तालुक्यात विखे गटाचे वर्चस्व

0

साकुरीत सत्ताधारी रोहम गटाचा दंडवते गटाकडून धुव्वा । राजुरीत अपक्षांचा वरचष्मा

राहाता (तालुका प्रतिनिधी) – राहाता तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये सत्ताधार्‍यांविरोधात मतदांरानी कौल दिला. पहिल्यांदाच थेट जनतेतून सरपंच निवडले गेले. त्यात अनेक तरुण चेहर्‍यांना मतदारांनी संधी दिली. साकुरी ग्रामपंचायतीमध्ये मतदरांनी सत्ताधार्‍यांची 15 वर्षांची सत्ता उलथवून टाकत ज्येष्ठ नेते स्व. भानुदास पाटील दंडवते यांचे चिरंजीव राजेंद्र दंडवते याना सरपंचपदी विराजमान केले. तर राजुरी ग्रामपंचायतीत सुमन गोरे यांचा अपक्ष उमेदवार सुरेश कसाब यांनी पराभव करत प्रस्थापितांना जोरदार धक्का दिला. साकुरीचा अपवाद सोडल्यास सर्वच ग्रामपंचायतींत विखेंच्याच दोन गटांत लढती झाल्या. त्या सर्व ग्रामपंचायती शतप्रतिशत विखेंच्या ताब्यात आल्या.

साकुरी ग्रांपंचायतीची सत्ता माजी सरपंच व विद्यमान जि.प.सदस्य दीपक रोहोम यांच्या ताब्यात होती. दीपक रोहम यांच्या विरोधात विरोधकांनी सर्वाची मोट बांधून जोरदार टक्कर दिली. रोहोम यांची गेल्या पंधरा वर्षांपासूनची सत्ता उलथवून टाकली. सरपंचपदासाठी ज्येष्ठ नेते स्व.भानुदास पाटील दंडवते यांचे चिरंजीव राजेंद्र दंडवते विजयी झाले.

त्यांच्या गटाचे 14 सदस्य निवडून आले. सत्ताधारी रोहम गटाला केवळ 3 जागा मिळाल्या. नांदुर्खी बुद्रुक ग्रामपंचायतीत सत्ताधारी राजेंद्र चौधरी यांच्या पूर्ण पॅनलचा पराभव झाला. विरोधी योगेश चौधरी यांच्या पत्नी सौ.विद्या चौधरी या सरपंच पदासाठी विजयी झाल्या. त्यांच्या गटाचे 11 सदस्य विजयी झाल्याने या ग्रामपंचातीमध्ये सत्तांतर होऊन योगेश अण्णासाहेब चौधरी गटाच्या ताब्यात ग्रामपंचायतीची सत्ता आली.

न.पा. वाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी आमदार अशोकराव काळे व ना. राधाकृष्ण विखे पाटील गटाने सत्ता कायम राखली असून येथे सरपंच पदसाठी ज्ञानदेव लक्षण साळुंके हे विजयी झाले. सत्ताधारी गटास 8 जागा तर विरोधी गटास केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. रांजणखोल ग्रामपंचायतीमध्ये मध्ये राहाता बाजार समितीचे माजी सदस्य आंबादास ढोकचौळे यांच्या गटाने सत्ता कायम राखत सरपंच पदासह 11 जागा जिंकून सत्ता कायम राखली.

विरोधी गटास येथे फक्त 2 जागांवर समाधान मानावे लागले. आडगाव खुर्द मध्ये सत्ताधारी विठ्ठलराव शेळके यांच्या गटाचा पराभव झाला. विरोधी बाबासाहेब शेळके यांच्या गटाने सरपंच पदासह 4 जागा मिळवून सत्ता हस्तगत केली. सत्ताधारी गटाला तीन जागा मिळाल्या मात्र गटाचे प्रमुख विठ्ठलराव शेळके यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

खडकेवाके ग्रामपंचायतीमध्ये जालिंदर मुरादे यांच्या नेतृत्वाखालील गटाने सरपंच पदासह 7 जागा जिंकून सत्ता हस्तगत केली. विरोधी गटाचे रामनाथ लावरे यांच्या केवळ दोन जागेवर समाधान मानावे लागले. सचिन सुरासे व भाऊसाहेब यादव या दोन उमेदवारांना समान 312 मते पडल्याने दोघांच्या नावाच्या चिठ्या टाकण्यात आल्या. लहान मुलाच्या हस्ते या चिठ्ठी काढण्यात आल्या त्यात सचिन सुरासे यांच्या नावाची चिठ्ठी निघाली. त्यांना विजयी घोषीत करण्यात आले.

डार्‍हाळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाऊसाहेब डांगे विजयी झाले. त्यांच्या गटाने सर्व 10 जागा जिंकून सत्ता कायम ठेवली. विरोधी गटास एकही जागा मिळाली नाही. राजुरी ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या 10 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. येथे सरपंच व सदस्य पदाच्या एका जागेसाठी पूर्ण निवडणूक यंत्रणा राबवावी लागली.

येथे मतदारांनी प्रास्थापिंताना जारेदार धक्का देत सरपंच पदाच्या दावेदार सौ.सुमन हरिचंद्र गोरे यांचा पराभव करत अपक्ष उमेदवार सुरेश कसाब यांना विजयी केले. सर्वसाधारण जागेसाठी झालेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सदाशिव रामदास दरेकर विजयी झाले त्यांनी शेख महम्मद बाबाजान शेख यांचा पराभव केला. दोन्ही जागांवर अपक्ष उमेदरांनी विजयी मिळविल्याने प्रास्थापितांना जोरदार धक्का दिला.

सावळईविहीर बुद्रुक मध्ये सत्ताधारी बाळसाहेब जपे यांच्या गटास सरपंच पदासह 5 जागांवर विजय मिळाल्याने सत्ता कायम ठेवण्यात ते यशस्वी झालेत. विरोधी पंचायत समिती सदस्य उमेश जपे यांच्या गटाचे 10 सदस्य विजयी होऊनही त्यांना सत्तेपासून वंचित राहावे लागले.

निघोज ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी गट व राहाता बाजार समिती संचालक शरद मते यांच्या गटाचेे सरपंच पदासह 4 सदस्य विजयी झाल्याने सत्ता कायम ठेवली. विरोधी रामभाऊ मते यांच्या गटाने तगडे आवाहन देऊनही त्यांना सत्तेने हुलकावणी दिली. रामभाऊ मते गटाचे 7 सदस्य निवडून आले. नांदुर्खी खर्द मध्ये सत्ताधारी पोपटराव वाणी यांच्या गटाने सरपंच पदासद 4 जागांवर विजय मिळवून सत्ता कायम ठेवली. येथे सुनील वाणी गटास 4 जागा मिळाल्या आहेत.

रांजणखोल
चांगदेव आंबादास ढोकचौळे (1466) सरपंचपदी विजयी, अमोल दत्तात्रय ढोकचौळे(1265) पराभूत.
विजयी सदस्य – लांडगे गोपाळ प्रभाकर (428), मनतोडे अनुराधा रतन (390), गायकवाड राजू तुकाराम (376), जाधव निर्मला निलेश (378), ढोकचौळे अनिल गंगाधर (530), अभंग मीरा दत्तात्रय (529), कुलथे मंदा लक्ष्मण (539), आवारे मंगल गणेश (362), बागुल सविता सिध्दार्थ (317), पठाण रजिया शकील (371), शिरसाठ प्रकाश वसंत (231), ढोकचौळे बाबासाहेब जगन्नाथ (221), शेख परवीनबी जाकीर (182) . 

लोहगाव (बिनविरोध)
चेचरे स्मिता भाऊसाहेब (सरपंच),
विजयी सदस्य – चेचरे सुरेश गणपत, सोनवणे रमाबाई शिवाजी, चेचरे सुमन रावसाहेब, सुरडकर संजय पांडुरंग, गिरमे सतीश राजाराम, दरंदले अलका बाबासाहेब, चेचरे बाबासाहेब कुंडलीक, चेचरे शांताराम बाबुराव, माघाडे मीना अण्णासाहेब, माळी नंदा सुरेश, बोर्डे दयाबाई यशवंत, गोपाळे विलास बाबासाहेब, इनामके कामिनी राजेंद्र.

नांदुर्खी
विद्या योगेश चौधरी (सरपंचपदी विजयी) मते (2161), पद्मा अरुण चौधरी (मते 712) पराभूत
विजयी सदस्य – दत्तात्रय सोन्याबापू चौधरी (390), पूनम नवनाथ चौधरी (389), लीलाबाई सोपान दाभाडे (389), भास्कर रावजी कोळगे (203), शीतल शिवाजी चौधरी (206) मीना सुधाकर चव्हण (374), जालिंदर रामदास चौधरी (367), सिंधू लक्ष्मण चौधरी (बिनविरोध), प्रल्हाद सुदाम चौधरी (336), शोभा संजय कुदळे (383), मंदा मनाजी चौधरी (374 ).

निघोज
गणेश दिलीप कणगरे (1061) सरपंचपदी विजयी, बाबासाहेब लक्ष्मण ठोकळ (846) पराभूत. विजयी सदस्य – अभिजीत भाऊसाहेब मते (325), रत्नमाला रवींद्र गाडेकर (357), आशा भाऊसाहेब मते (365), पार्वतीबाई किसन माळी (251), विजय पुंजा काळे (280), दीपाली विष्णू गाडेकर (249), भारत बाबासाहेब मते (348), ज्योती राजेशधीवर (337), अलका जगन चव्हान (329), सचिन उत्तम भारसाकळ (262), मेघा कालीचरण काळे (255).

न. पा. वाडी
ज्ञानदेव लक्ष्मण साळुंके (765) सरपंचपदी विजयी, कोंडीराम तुकाराम साळुंके (544) पराभूत.
विजयी सदस्य – धनवटे राजेंद्र धोंडीराम (277), धनवटे शारदा विजय (270), वहाडणे विद्या उत्तम (239), साळुंके अलका कोंडीराम (बिनविरोध), वहाडणे बाळकृष्ण तुकाराम (200) गायकवाड ललिता दीपक (218), जाधव दत्तात्रय रामभाऊ (308), उगले सविता बाबासाहेब (301), धनवटे योगीता दादासाहेब (291).

साकुरी
राजेंद्र भानुदास दंडवते (2538) सरपंचपदी विजयी, दीपक हरिभाऊ रोहम (2222) पराभूत.
विजयी सदस्य – दंडवते विक्रांत उध्दवराव (427), लुटे सविता भागवत (427), दंडवते रोहिणी सदाशिव (400), सुनील शांतागीर गोसावी (504), शीलाबाई दिलीप बनसोडे (532), प्रदीप पोपटराव बनसोडे (506), अंकुश भानुदास भडांगे (554), छाया अशोक बनसोडे (461), राजेश नामदेव लुटे (454), निकिती अक्षय रोहोम (444), लताबाई उमाकांत शिरकांडे (बिनविरोध), स्वप्निल एकनाथ बावके (554), शकुंतला नामदेव लुटे (474), रंजना भागवत दंडवते (बिनविरोध), सचिन योसेफ बनसोडे, (436), भाऊसाहेब भगवंता आहेर (410) सुनीता विश्वनाथ बनसोडे (379).

राजुरी
कसाब सुरेश नारायण ( 1521) सरपंचपदी विजयी, सुमन लक्ष्मण गोरे (778) पराभूत.
विजयी सदस्य – दरेकर सदाशिव रामदास (323). बिनविरोध सदस्य-कदम मंदाकिनी लक्ष्मण, कदम सीमा मधुकर, सुधाकर दादा गोरे, आहेर सुनीता सुरेश, भालेराव मधुकर मारुती, गोरे आरती गणपत, गोरे मंदाकिनी रावसाहेब, कदम अर्जुन नामदेव, गोरे भाऊसाहेब भिमाजी, दळे अनिता किशोर.

नांदुर्खी खु.
बापूराव गुलाब वाणी (484) सरपंचपदी विजयी, सुनील दौलतराव वाणी (452) पराभूत.
विजयी सदस्य – वाणी सतीश रघुनाथ (212), वाणी सुरेखा रामनाथ (206), वाणी वसंत सुदाम (99) प्रियंका शामपुरी गोसावी (101), सतीश संपत वाणी (173) उषा विजय वाणी (193), सुजाता सतीश वाणी (188).

खडकेवाके
सचिन अण्णासाहेब मुरादे (740) सरपंचपदी विजयी, गोरक्षनाथ सोन्याबापू मुरादे (656) पराभूत.
विजयी सदस्य – वंदना लक्ष्मण गायकवाड (244) प्रियंका शिवाजी मुरादे (262), नवनाथ चांगदेव मुजमुले (162), सुनीता अशोक लावरे (194), उषा नवनाथ मुजमुले 192), सुनील भिकाजी पोकळे (339), सचिन भगवंत सुरासे (312), सुवर्णा सुनील यादव (312) जालींदर गंगाधर मुरादे (267).

सावळीविहीर बु.
रूपाली संतोष आगलावे (2096) सरपंचपदी विजयी, रूपाली संजय जपे, (1663) पराभूत.
विजयी सदस्य – स्वप्निल वैजीनाथ पारधे (444), जिजाबा शुक्लेश्वर आगलावे (513), संगीता संजय परदेशी (434), गणेश नारायण कापसे (495), पद्माबाई मधुकर वाघमारे (445), मालन हरिभाऊ जपे (402), बाळासाहेब जनार्दन जपे (511) सारिका प्रवीण वाघमारे (496) रोहिणी चंद्रशेखर जपे (543) सागर गुणवंत पगारे (359) नितीन रामदास मातेरे (341), मथुरा रामचंद्र बर्डे (416), नितीन शंकर आगलावे (359), चित्रा संतोष गायकवाड (372), वृषाली ओमेश जपे (391).

आडगाव खुर्द
प्रदीप उत्तमराव गायकवाड (288) सरपंचपदी विजयी, प्रभाकर आनंदराव गायकवाड (198) पराभूत.
विजयी सदस्य – मंगल शिवाजी शेळके (128), मंगेश अशोक गायकवाड (128), दीपाली गणपत शेळके (124), भारती कानिफनाथ माळी (163), संगीता रमेश शेळके (142), चंद्रकला कचेश्वर शेळके (140), नागेश्वर साहेबराव काळे (86).

डोर्‍हाळे
भाऊसाहेब बाबूराव डांगे (1001) सरपंचपदी विजयी, नारायण दत्तात्रय काकड (538) पराभूत.
विजयी सदस्य – शिवाजी सावळेराम डांगे (301), मीननाथ रघुनाथ हेगडे (355), शुभांगी रवींद्र लांडगे (353), बाळासाहेब पुंजा डांगे (313), शीलाबाई दिनकर डांगे (बिनविरोध), स्वप्नाली चांगदेव सरोदे (बिनविरोध), संदीप आबासाहेब जपे (बिनविरोध), कविता रवींद्र डांगे (563), मंगल विश्वनाथ डांगे (579).

 

LEAVE A REPLY

*