Type to search

पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचारीच : राहुल गांधी

देश विदेश राजकीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचारीच : राहुल गांधी

Share

नवी दिल्ली : राफेल करारावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आक्रमक झाले असून गुरुवारी राहुल गांधी यांनी थेट नरेंद्र मोदींवरच गंभीर आरोप केले आहेत. नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारी आहेत. नरेंद्र मोदी हे अनिल अंबानींचे चौकीदार असून त्यांनी सरकारी तिजोरीतील ३० हजार कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिशात टाकले, अशा शब्दात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

राफेल करारासंदर्भात फ्रान्सची इन्व्हेस्टिगेटिव्ह वेबसाईट मीडियापार्टने बुधवारी केलेल्या दाव्यानुसार, राफेल करारासाठी भारत सरकारने अनिल अंबानींच्या रिलायन्स कंपनीचं नाव प्रस्तावित केलं होतं. या करारांतर्गत लढाऊ विमानांच्या एकूण किंमतीच्या ५० टक्के रक्कम म्हणजे सुमारे ३० हजार कोटी रुपये भारताला ऑफसेट किंवा रिइन्व्हेस्टमेंट म्हणून देणे बंधनकारक करण्यात आले होते. या रकमेला ‘कॉम्पेन्सेशन’ असा शब्द करारात वापरण्यात आला होता. या शब्दालाही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत आक्षेप घेतला.

५ हजार कोटी रुपयांचं कर्ज डोक्यावर असलेले उद्योगपती अनिल अंबानी दहा दिवसात डिफेन्स कंपनी उघडतात आणि या कंपनीला ३० हजार कोटी रुपये या करारामार्फत देण्याची पंतप्रधान तजवीज करतात, हे सर्व फार गंभीर आहे. पंतप्रधान भ्रष्ट आहेत. त्यांनी या प्रकरणाचा खुलासा करावा. अन्यथा या भ्रष्टाचारासाठी पदाचा राजीनामा द्यायला हवा,’ अशी मागणी राहुल यांनी केली आहे. राफेल करारावरुन वादळ उठले असतानाच देशाच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण फ्रान्समध्ये पोहोचल्या आहेत. संरक्षणमंत्र्यांना तिथे जाण्याची इतकी घाई का होती, असा सवालही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत विचारला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!