Type to search

Featured हिट-चाट

..म्हणून राधिका आपटेनं स्वत:च्या लग्नात नेसली विरलेली साडी

Share

मुंबई : कलाकार आणि त्यांच्या रंगीबेरंगी, महागड्या फॅशनेबल कपड्यांची नेहमी चर्चा होत असते. अभिनेत्री राधिका आपटेनं तिच्या फॅशनच्या आवडीनिवडीबाबत सांगताना तिच्या लग्नातली एक आठवण सांगितली. 2012 साली तिचा विवाह झाला. त्यावेळी विवाहसोहळ्यामध्ये तिनं तिच्या आजीची साडी नेसली होती असा खुलासा तिनं केला.

राधिकानं तिच्या लग्नाच्या दिवसाबद्दल सांगताना तिची ही आठवण सांगितली. ममाझी आजी माझ्या सर्वात जवळची व्यक्ती आहे. माझ्या आयुष्यातील खास दिवशी ती माझ्या जवळ असावी असं मला वाटत होतं. त्यामुळे लग्नाच्या दिवशी मी तिची साडी नेसायचे ठरवले. ती आजीची जुनी साडी असल्याने जीर्ण झाली होती, त्याला बारिक-बारिक छिद्रसुद्धा पडली होती. पण तिची साडी माझ्यासाठी खूप खास होती. मुळात मला जास्त फॅशनेबल कपडे घालायला आवडत नाही किंवा कपड्यांवर फार पैसा खर्च करायलादेखील आवडत नाही.

मी नोंदणी पद्धतीनं विवाहबद्ध झाले त्यामुळे त्या दिवशी मी आजीची साडी नेसली आणि आम्ही आमच्या कुटुंबीयांना आणि जवळच्या मित्र मंडळींना ज्यावेळी आमच्या लग्नाची छोटी पार्टी दिली त्यावेळीसुद्धा मी अगदी 10 हजारापेक्षा कमी किमतीचा एक ड्रेस घातला होता. असं राधिकानं सांगितलं.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!