कर्डिलेंची भाजप ऑफर म्हणजे मनोरंजन : राधाकृष्ण विखे पाटील

0

 राष्ट्रवादीच्या पांडुरंग अभंगांच्या भूमिकेचे स्वागत

अहमदनगर (प्रतिनिधी) – आ. शिवाजीराव कर्डिले यांनी डॉ. सुजय यांना दिलेली खासदारकीची ऑफर ही मनोरंजन आहे. काही गोष्टी मनोरंजनातून पहाव्यात. मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. पांडुरंग अभंग यांच्या मताचे काँग्रेसमध्ये स्वागत आहे. लोकसभेच्या जागेबाबत अद्याप राष्ट्रवादीशी चर्चा झालेली नाही. पण निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुढील आठवड्यात दोन्ही पक्षाच्या पदाधिकार्‍यांची बैठक होईल. त्यावेळी नगरच्या जागेचा विषय निघाल्यास पाहू, असे स्पष्टीकरण विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी नगरमध्ये दिले. 

मनपासाठी आघाडी हवी – 
शुक्रवारी नगरला झालेल्या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भात व सरकारच्या विरोधात संघर्ष तीव्र करण्यासाठी रणनिती ठरविण्यासाठी बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीला डॉ. सुजय विखे गैरहजर होते. त्यांना अचानक कामानिमित्त दिल्लीला जावे लागले असल्याचा खुलासा विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी केला. नगर महानगरपालिका निवडणुकीबाबत दोन्ही पक्षांची लवकरच बैठक होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी करण्याचा आमचा आग्रह राहणार असल्याचे विखे यांनी सांगितले.

नगर एमआयडीसी परिसरातील भूसंपादनाला शेतकर्‍यांनी विरोध केला असल्याबाबत विखे यांच्याकडे विचारणा केली असता राज्यात अनेक ठिकाणी भूखंड घोटाळा झालेला आहे. राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या जमीन घेऊ नयेत. अनेक ठिकाणी शेतकर्‍यांच्या जमिनीचे भूसंपादन केले जाते. मात्र, याठिकाणी काहीच होत नाही, असा आरोप विखे यांनी यावेळी केला. 

LEAVE A REPLY

*