Type to search

Featured मुख्य बातम्या राजकीय सार्वमत

अधिवेशनाआधी विखेंचा मंत्रिमंडळात समावेश

Share

खा. दानवे यांचा खुलासा : 17 जूनआधी मंत्री होणार?

मुंबई (प्रतिनिधी) – आगामी पावसाळी अधिवेशनाआधी ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश झालेला असेल, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. त्यामुळे 17 जूनपासून सुरू होणार्‍या अधिवेशनाआधी विखे मंत्री झालेले असतील, अशी शक्यता वाढली आहे.

शुक्रवारी सायंकाळी एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात खा. रावसाहेब दानवे सहभागी झाले होते. यावेळी विखेंचा मंत्रिमंडळात समावेश कधी? या प्रश्‍नावर अधिवेशनाआधी, असे उत्तर त्यांनी दिले. त्यामुळे विखे यांच्या मंत्रिपदाचा मुहूर्त अधिवेशनाआधी लागेल, हे स्पष्ट झाले आहे. राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन तीन आठवड्यांनी म्हणजे 17 जूनपासून सुरू होत आहे. त्याआधी विखेंचा समावेश होणार म्हटल्यावर पुढील दोन आठवड्यात याबाबत चित्र स्पष्ट होणार, असे मानले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत नगर लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत ओढाताण झाली. राष्ट्रवादीने डॉ. सुजय विखे यांच्यासाठी ही जागा सोडण्यास नकार दिल्यानंतर डॉ.सुजय यांनी भाजपा प्रवेश करून निवडणूकही जिंकली. राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपात प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे त्यांनी जाहीर केले आहे. मात्र कार्यकर्त्यांचे इच्छा पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यावरून विखेंचा भाजपा प्रवेश निश्‍चित मानला जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!