काँग्रेस कार्यालयावरील हल्ला; विखेंची हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

0

मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र निषेध करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले कीहा हल्ला अत्यंत भ्याड स्वरुपाचा होता. केवळ सवंग प्रसिद्धीसाठी हा हल्ला करण्यात आला.

या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेअसे सांगतानाच विरोधी पक्षनेत्यांनी हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. 

LEAVE A REPLY

*