Photo Gallery : ‘रेस अराउंड ऑस्ट्रिया’वर नाशिकचा झेंडा; सायकल रेस पूर्ण करणारे पहिलेच भारतीय

0
नाशिक : नाशिकच्या सायकलीस्टने जगभरातील सायकलिंग स्पर्धा जिंकण्याचा जणू धडाकाच लावला असून लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू आणि दर्शन दुबे यांनी रेस अराउंड ऑस्ट्रिया ही युरोपातील सर्वात अवघड अशी स्पर्धा पूर्ण करत विक्रम केला आहे. ही स्पर्धा पूर्ण करणारे ते पहिलेच  भारतीय बनले असून नाशिकच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला आहे.
लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू हे नाशिक आर्टीलरीच्या स्पेस सेंटरमध्ये एरोनॉटीकल इंजिनिअर असून ब्रेवेट उपक्रमातून त्यांनी रॅन्डोनर सायकलीस्ट आहेत. तर सुपर रॅन्डोनर सायकलीस्ट असलेले दर्शन दुबे हे मूळ नाशिकचे असून नोकरी निमित्ताने ते बंगळूरू येथे असतात.
‘टीम इंस्पायर इंडिया’चे भारत आणि दर्शन यांनी जगभरातील सर्वोत्तम अल्ट्रा सायकलिस्ट्सशी स्पर्धा करत २२०० किमीची शर्यत पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी ११७ तासांची वेळ असताना ‘टीम इंस्पायर इंडिया’ने केवळ १०० तासात स्पर्धा पूर्ण केली. केवळ ८ महिन्याच्या प्रशिक्षण आणि सरावाच्या बळावर या जोडीने हे यश मिळवले आहे.
काय आहे रेस अराउंड ऑस्ट्रिया?
रेस अराउंड ऑस्ट्रिया ही युरोपातील सर्वात अवघड आणि आव्हानात्मक स्पर्धा आहे. ऑस्ट्रिया द्शाच्या सिमेजवळून जाणाऱ्या रस्त्यांनी ही स्पर्धा पूर्ण करावयाची असते. समुद्रसपाटीपासून जास्तीतजास्त १७५०० फूट चढ उतार असलेला रस्ता असून ग्रॉसग्लॉकनेर सारख्या उंच ठिकाणाचाही यात समावेश आहे. या स्पर्धेसाठी असणारा निर्धारित रस्ता कोणत्याही वाहनांसाठी बंद करण्यात येत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आव्हानात्मक बनते. ही स्पर्धा पूर्ण करणारा स्पर्धक ‘रॅम’ स्पर्धेसाठी पात्र ठरतो.

LEAVE A REPLY

*