Type to search

ब्लॉग

Blog : क्यू असेल क्युट ?

Share

गुगलने अ‍ॅन्ड्राईड क्यू अपडेटची बीटा टेस्टींग केल्यानंतर स्टेबर अपडेट मिळणार्‍या स्मार्टफोन्सची यादीही जाहीर केली आहे. अद्याप अनेक फोन ओरिओ (ेीशे)वर आहेत. तर गेल्या दोन महिन्यात लाँच झालेल्या मोबाईलसह अन्य काही स्मार्टफोन्सला स्टेबल पाय (झळश) अपडेट मिळाले आहे. गुगलने अ‍ॅन्ड्राईड क्यूच्या तिसर्‍या बीटाची अपडेची नुकतीच घोषणा केली. अपडेटेड नव्या व्हर्जनमध्ये नोटिफिकेशन पॅनल, नवीन फोकस मोड, लाईव्ह कॅप्शन, लोकेशन शेअरिंग, अन डू अ‍ॅप रिमूव्हल, बबल्स चॅट, वाय-फाय शेअरिंगसारखे अनेक नवे फीचर जोडण्यात आले आहेत. त्यामुळे युजर्सला नवा मल्टीटास्कींगचा अनुभव मिळेल, असा गुगलचा दावा आहे.

नवे व्हर्जन स्क्रीन डायमेंशन्सला सहज अडॉप्ट करणार आहे. यामुळे मोबाइल विश्वातल्या अनेक गोष्टी भविष्यात सोप्या होणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. जगात ऐकायला न येणार्‍या आणि कमी ऐकू येणार्‍यांची संख्या जवळपास 46.6 दशलक्ष आहे. प्रत्येक प्रकारचा मजकूर सामान्यांप्रमाणेच त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल, अशी फिचर्स गुगलच्या या ऑपरेटींग सिस्टिममध्ये आहे, असे कंपनीने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. प्रत्येक युजरला डिजिटल मीडियाचा सहज-सुलभ लाभ घेता येईल या दृष्टीकोनातून ही सिस्टिम डेव्हलप करण्यात आली असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

लाइव कॅप्शन्स वीडियो, पॉडकास्ट आणि ऑडियो मॅसेजसाठी ही सिस्टिम प्रभावी ठरणार आहे. त्यासाठी वाय-फाय किंवा मोबाइल डेटाची गरजच राहणार नाही. ऑफलाइन असतानाही तुम्ही डेटा ट्रान्सफर करू शकाल, असे हे नवे तंत्र आहे. क्यू चे बीटा व्हर्जन युजर्ससाठी खुले केल्यानंतर त्यात असलेले बग्ज् फिक्स केल्यानंतर स्टेबल व्हर्जन अपडेट मिळणार्‍या स्मार्टफोनची यादी गुगले जाहीर केली आहे.

त्यात
Google Pixel 3, 3XL
· Google Pixel 2, 2XL
· Google Pixel, XL
· Realme 3 pro
· Oneplus 6T
· Nokia 8.1
· Asus zenFone 5Z
· Huawei Mate 20 Pro
· Tecno spark 3 pro
· VIVO Nex s, Nex A, x27
· Sony xperia xz3
· oppo reno
· xiaomi mi 9, Mi X 35G
· LG G8, ThinQ
· Esencial phone
अशा 21 स्मार्टफोन्सचा समावेश आहे.

– संतोष तांबे
9511516363

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!