Photo Gallery : धोंड्याचे वाण लावण्यासाठी नाशिककरांची लगबग

0

देशदूत डिजिटल विशेष

धोंड्याचा महिना, अधिक मास, पुरुषोत्तम महिना ही वेगवेगळ्या ठिकाणी उच्चारण्यात येणारी अधिकमासाची नावे आहे. तीन वर्षांतून येणाऱ्या महिन्यास नुकतीच सुरुवात झाली आहे. सासरेबुवा जावई आणि मुलीला घरी बोलावून विविध वाण या महिन्यात लावण्याची परंपरा आहे. यात बत्तासे, अंगठी, वेगवेगळ्या प्रकारचे दिवे, दीप यांचा समावेश असतो. आपापल्या परिस्थितीनुसार जावयांना वान लावले जातात.

या दिवशी त्यांना गोडधोड जेवण भरवून मान सन्मान दिला जातो. यंदा नवीन लग्न झालेल्या जोडप्यांची तर चंगळच झाली आहे. लग्न झाल्यानंतर थोड्याच दिवसांनी सासरवाडीला जाऊन त्यांना यथेच्छ मानपान देण्यात येत असल्यामुळे नवजावयांमध्ये आनंदाचे वातारवण आहे.

नाशिकमधील गंगेवर पूर्वीच्या काळापासून दिवे, दीप, अनारसे व बत्तासे मिळण्याचे प्रसिद्ध ठिकाणे आहेत. गंगेवर नियमित येणारे भाविक या दुकानांमध्ये गर्दी करत असतात. याठिकाणी अनेक पुरातन वस्तू आजही मिळतात.

जावई बापूंचा मानपान राखण्यासाठी या दुकानांमध्ये सध्या मोठी गर्दी आहे. वाणासाठी लावण्यात येणाऱ्या दिव्याची किंमत २० रुपयांपासून पुढे असून अनेक हौशी मंडळी चांदीचा वाणदेखील लावतात. मोठा दिवा ३० रुपयांना मिळतो. हे दिवे जसे घेतले तसे आहेत अगदी ८० रुपयांनादेखील हा दिवा मिळतो.

दीपज्योती उपलब्ध असून त्या डझनवर मिळत आहेत. डझनाला ८० रुपयांचा दर आहे. वाणासोबत बत्तासे व अनारसेदेखील लावण्यात येतात. बत्तासे ८० रुपये किलोने उपलब्ध आहेत तर अनारसे २०० रुपये किलोने याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सर्व फोटो : सतीश देवगिरे, नाशिक

LEAVE A REPLY

*