पुणतांबा ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर हल्लाबोल

0

15 ऑगस्टच्या ग्रामसभेचे कामकाज रोखण्याचा इशारा

पुणतांबा ( वार्ताहर) – ग्रामपंचायतीच्या गलथान कारभाराच्या निषेधार्थ पुणतांब्यातील ग्रामस्थांनी सोमवारी ग्रामपंचायतीच्या कार्यालयावर धडक मोर्चा नेला व ग्रामपंचायतीच्या कारभारावर हल्लाबोल करून जोरदार टिका केली. मोर्चाचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य श्याम माळी यांनी केले.

मोर्चात माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. धनंजय धनवटे, बाळासाहेब चव्हाण, विजय धनवटे, बाळासाहेब भोरकडे, गणेशचे संचालक राजेंद्र थोरात, अनिल नळे, बाळासाहेब भोरकडे आदींसह मान्यवर तसेच ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी 10.30 वाजेच्या दरम्यान वाजतगाजत गावातील मुख्य रस्त्यावरून ग्रामपंचायत कारभाराच्या निषेधार्थ घोषणा देत मोर्चाची सुरुवात झाली.

मोर्चेकरांनी ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारावर प्रकाश टाकणारे फलक हातात घेतले होते. पुणतांबा ग्रामपंचायतीत संत्तातर झाल्यानंतर साडेचार वर्षानंतर प्रथमच ग्रामस्थांनी मोर्चा काढल्यामुळे मोर्चात मोठ्या संख्यने ग्रामस्थ सहभागी होते. ग्रामपंचायत कार्यालयासमोर आल्यानंतर जाहीर सभा घेण्यात आली. प्रास्ताविक जालिंदर इंगळे यांनी केले.
यावेळी डॉ. धनंजय धनवटे यांनी ग्रामपंचायत कारभारावर जोरदार टिका केली.

गटार व्यवस्थेचे काम सदोष असून गटारीचे पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे गावात रोगाचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता आहे. चौदाव्या वित आयोगातून दरवर्षी सत्तर लाख वजन सुविधा योजनेअंर्तगत दरवर्षी तीस लाख असे साडेचार वर्षात साडेचार कोटी रुपयाची कोणती कामे ग्रामपंचायतीने केली आहे. रस्ते, गटार योजना यांच्या कामांचे नियोजन ठेकेदार करतात.

जिल्हा परिषद सदस्य श्याम माळी यांनी गावातील पाणीपुरवठा स्वच्छता, रस्त्यांची दुरुस्ती, दिवाबत्ती या सेवा सुविधामध्ये सुधारणा झाली नाही. तर स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आयोजित करण्यात येणारे ग्रामसभेचे काम होऊ देणार नाही असा इशारा दिला.

यावेळी बाळासाहेब चव्हाण, नितीन भगत, बाळासाहेब भोरकडे, अ‍ॅड. अशोक वाणी, निलेश दुरगुडे, दिपक गोरे, प्रकाश लोंढे, सदाशिव वहादूळे, आबा नळे, विशाल चव्हाण, विजय धनवटे, अभय घोडेकर आदींसह अनेकांनी मनोगत व्यक्त केले.

गर्दी झाल्यामुळे काही काळ गोंधळ झाला मात्र सरपंच छायाताई जोगदंड, उपसरपंच प्रशांत वाघ यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यामुळे वातावरण शांत झाले. मोर्चात शुकलेश्वर वहाडणे, पंकज नळे, मुन्ना नवले, भास्कर नवले, राजेंद्र शिरसाठ, बालम बोर्डे, राजेंद्र थोरात आदींसह मान्यवर व ग्रामस्थ सहभागी होते.

ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच गावात राहत नाही त्यामुळे त्यांना ग्रामस्थांच्या अडचणी समजत नाही. ग्रामसेवकाची तातडीने बदली करावी व ग्रामस्थांना मूलभूत सेवा सुविधा तातडीने पुरविण्याची मागणी केली. ग्रामपंचायत कारभार करता येत नसेल तर पदाधिकार्‍यांनी राजीनामा द्यावा, असे आवाहन केले. ग्रामस्थाच्या वतीने निवेदन स्विकारण्यासाठी सरपंच छायाताई जोगदंड व उपसरपंच प्रशांत वाघ व ग्रामसेवक सोमनाथ पटाईत आले असता ग्रामस्थांनी त्यांच्यावर प्रश्‍नांचा भडीमार केला. बाळासाहेब भोरकडे यांनी तर उपसरपंच प्रशांत वाघ यांना भाषण करू दिले नाही. मोर्चा संपल्यानंतर मोर्चातील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला. 

LEAVE A REPLY

*