Wednesday, April 24, 2024
Homeनगरपुणतांबा गावाला पुरेशा दाबाने पाणी मिळणार का ?

पुणतांबा गावाला पुरेशा दाबाने पाणी मिळणार का ?

पुणतांबा | Puntamba

जलस्वराज टप्पा क्र. 2 या योजनेतून पुणतांब्याची अंदाजे 17 कोटींची पाणी योजनेच्या प्रशासकीय मंजुरीस मान्यता मिळण्यास उशीर झाला. तोपर्यंत ग्रामपंचायतीची निवडणूक आचरसंहिता लागू झाली. पाणी योजनेचे पुढील काम थांबले आणि निवडणुकीच्या धामधुमीत माजी आमदार स्नेहलता कोल्हे गटाचे नेतृत्व करणारे पुणतांबा विकास आघाडीचे धनंजय जाधव याच्या गटाचा पराभव होऊन ग्रामपंचायतीची सत्ता गेली आ. राधाकृष्ण विखे प्रणित जनसेवा मंडळाच्या हाती सत्ता आली.

- Advertisement -

जलस्वराज टप्पा क्र.2 ची पाणी योजना जागतिक बँकेच्या आर्थिक सहकार्यातून तत्कालीन राज्य सरकारने स्विकालेला हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. संपूर्ण पाणी योजनेच्या कामासाठी अध्यक्ष व इतर उपसमित्यांची स्थापना ग्रामसभेतून करावी, असे मार्गदर्शक सुत्रानुसार तसे करणे आवश्यक होते. त्यानुसार पाणीपुरवठा कमिटी अध्यक्षपदासाठी सत्ताधारी सरपंच डॉ. धनंजय धनवटे गट व विरोधी धनंजय जाधव गट यांच्यात मोठा राजकीय संघर्ष पाहिला. या संघर्षात सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांना अध्यक्षपद व तत्कालीन उपसरपंच वंदना विजय धनवटे यांना सचिवपद मिळविण्यात यश आले. या घडामोडीनंतर योजनेच्या कामास सुरुवात झाली.

आ. राधाकृष्ण विखे पाटील व तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच डॉ. धनंजय धनवटे व कमिटीने प्रस्तावित योजनेच्या त्रुटी कशा आहेत त्या दुरुस्ती करण्यासाठी अभ्यासपूर्ण नियोजन केले. यामध्ये पाणी योजनेत 30 वर्षांकरिता 16 हजार लोकसंख्या गृहित धरली. प्रत्यक्षात सर्व पुराव्यासह लोकसंख्या 25 हजार इतकी आहे. जुन्या तळ्याची क्षमता कागदोपत्री 52 एमएलडी आहे. आजच्या सर्व्हेनुसार 48 एमएलडी आहे. त्यात जीओमेमब्रेन कागद नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी पाझरुन 18 दिवसच टिकते.

गावची लोकसंख्या गृहीत धरून माणसी 70 प्रतिलिटर पाण्याची गरज लक्षात घेता 60 दिवसांकरिता 105 एमएलडी पाण्याची गरज आहे. जुना साठवण तलावातून आज 18 एमएलडी व नवीन तलाव क्षमता 36 एमएलडी असे 54 एमएलडी पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे 50 टक्के पाण्याची तूट निर्माण होणार. नविन जागेत 5 एकर ऐवजी 9 एकर तळे करावे. प्रस्तावित पाईपलाईन कॅनॉलपासून 6 कि.मी. चे अंतर 6 ठिकाणी वळण घेणार याच सार्वजनिक स्वरूपातील अनेक अडथळे येतात. काम रेंगाळेल म्हणून कॅनॉलपासून आलेल्या चारीच्या बाजूने सरळ घेण्यात यावे.

कॅनॉलमधून पाणी घेण्यासाठी असलेल्या पाईपची साईज 1.5 फुट आहे आणि पाटबंधारे विभागाने यासाठी साठवण तळे भरण्यासाठी 18 तास कालावधीचे लेखी पत्र दिले आहे. यावेळेत तळे भरणे शक्य नाही. याकरिता वाढीव कालावधीची आवश्यकता आहे. प्रस्तावित योजनेत नविन फिल्टर प्लॅन्ट नाही. आजही पाणी शुध्दीकरण करण्यात अडथळे येतात. म्हणून फिल्टर प्लॅन्टमध्ये नवीन मशानरी प्रस्तावित करावी. जलस्वाराज टप्पा-2 च्या सर्व्हेमध्ये 3200 कुटुंब आहेत. त्यांना मिटरने पाणी देणे योजनेत बंधनकारक आहे.

मिटर किंमत 6500 रुपये आहे. म्हणून ही किंमत 2 कोटी 40 लाख इतका खर्च अपेक्षीत आहे. असा खर्च करण्यास ग्रामपंचायत सक्षम नाही. यातही सुधारणा करून योजनेतून सदर खर्च करावा, चार नवीन टाक्या घेण्यात आल्या. त्यानुसार शालिनीताई विखे पाटील याच्या माध्यमातून पाणी योजनेच्या विविध मंजुर्‍यांसाठी प्रयत्न सुरू केले. शिवाय आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमवेत जीवन प्राधिकरणाच्या उच्चस्तरीय अधिकार्‍यांच्या बैठका घेऊन योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

पाणीपुरवठा समितीसह इतर उपसमित्या यांची स्थापना करून पाणी योजनेच्या कामाची सुरुवात झाली. विविध भागातील पाण्याच्या टाक्या, पाणी साठवण तळे, गाव अंतर्गत नविन पाईपलाईन टाकाने निश्चित केलेल्या कुटुंबांना नविन नळ जोडणी देणे आदी कामे अंतिम टप्प्यात आलेले असताना काही भागात पाणी वितरणाची चाचणी घेण्यात आली असून कमी दाबाने दररोज पाणी मिळेल, असा सरपंच व पाणीपुरवठा कमिटी अध्यक्ष डॉ. धनंजय धनवटे यांचा दावा आहे.

जलस्वराज टप्पा क्र.2 ही पाणी योजना पूर्ण झाल्यावरच गावकर्‍यांची तहान भागणार की नाही हे आगामी काळातच कळेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या